कर्जतमध्ये आपत्तीकाळात बचावासाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:04 AM2020-02-16T01:04:40+5:302020-02-16T01:04:48+5:30
संडे अँकर । जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम; जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचे नियोजन
कर्जत : रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय यांच्यातर्फे कर्जतमध्ये शोध व बचाव प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या आपत्तीमध्ये सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक पातळीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचे नियोजित केले आहे. या उपक्रमात स्थानिक पातळीवर ट्रेकर्स, नागरी संरक्षण दलातील सदस्य व सर्वसामान्य नागरिक यांना सामावून घेण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये कर्जत व खालापूर तालुक्यातून विविध संस्थांमधून सदस्य प्रशिक्षणासाठी आले होते. या आपत्ती शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी कर्जत निवासी नायब तहसीलदार राठोड आदी अधिकारीही उपस्थित होते.
1या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उरण येथील नागरी संरक्षण दलातील उपनियंत्रक राजेश्वरी कोरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याचबरोबर समाधान कडू या प्रशिक्षकांनी शोध व बचाव कार्यात आपली भूमिका काय? शोध व बचाव कार्य वेगवेगळ्या आपत्तीमध्ये कशाप्रकारे करावे.
2पूरपरिस्थितीमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या साधनांचा वापर करून आपण आपले व इतरांचे जीव कसे वाचवू शकतो, उंच इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित कसे खाली उतरवावे. याचबरोबर एखादा जैविक किंवा रासायनिक हल्ला झाल्यास त्यापासूनही नागरिकांचे कसे संरक्षण करावे, याबद्दल उत्तम प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या संस्था
कर्जतमधील रक्षा सामाजिक विकास मंडळ, धूमकेतू ट्रेकर्स, माथेरान येथील सह्याद्री मित्र आपत्कालीन व्यवस्थापन संस्था तसेच खोपोली, खालापूरमधून पूर्वीपासून शोध व बचाव कार्यात अग्रगण्य असलेल्या यशवंती हायकर्स या संस्थेतील सदस्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या सदस्या पल्लवी ढवळे व संस्थेच्या सदस्य व एनएसएसच्या विद्यार्थिनी नेहा जाधव
यांनी पुरुष प्रशिक्षणार्थीच्या बरोबरीने
हे तीन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले.