डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कर्जतमध्ये प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:34 AM2020-04-26T00:34:15+5:302020-04-26T00:34:19+5:30

आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या समस्या आणि मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

Training of doctors, staff in Karjat | डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कर्जतमध्ये प्रशिक्षण

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कर्जतमध्ये प्रशिक्षण

Next

कर्जत : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या समस्या आणि मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख सुचिता गवळी आणि डॉ. अमोल भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, कशेळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम खंदाडे यांनी सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोविड-१९ या विषयावर प्रशिक्षण देत प्रात्यक्षिकही दाखविले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कशा प्रकारे रोखता येईल, याबाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाविषयी माहिती डॉक्टर अमोल भुसारी यांनी दिली. संशयित रुग्ण कशाप्रकारे ओळखला पाहिजे, याचबरोबर क्लास वन वर्ग, क्लास टू वर्ग, क्लास थ्री वर्ग, क्लास फोर वर्ग यांनी कशाप्रकारे पीपीई कीट घातले पाहिजेत, आदी सूचना देण्यात आल्या. या वेळी कर्जत उपजिल्हा आणि कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

>जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबागकडून १०० पीपीई कीट उपलब्ध झाले आहेत. तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पीपीई कीट घालण्याचे व बदलण्याचे रूम वेगवेगळे आहेत.
- डॉ. मनोज बनसोडे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत

Web Title: Training of doctors, staff in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.