उरण : जासई येथील राजिप शाळेत समग्र शिक्षा अभियान, महाराष्ट्र शासन आणि प्रथम इंन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माझी ई-शाळा उपक्रम अंतर्गत तालुक्यातील ३७ शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे. डिजिटल साधने आणि त्यांचा वापर यांमधील दरी कमी करणे, शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विध्यार्थ्यांचा प्रगतीचा स्तर उंचावणे हे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रशिक्षणामध्ये हायब्रीड अध्ययन पद्धतीवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी वाढेल याची प्रात्यक्षिके देखील घेतली गेली. प्रशिक्षण कार्यक्रमाला केंद्रप्रमुख टी.जी.म्हात्रे , नरेश मोकशी , ज्योती ठाकूर,अनिता काटले ,गुरुनाथ ठोंबरे,मुकेश महाजन तसेच उरण तालुक्यातील शाळांमधील शिक्षक उपस्थित होते. इन्फोटेक फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक राकेश डिंगणकर, इस्माईल गोरिखान तसेच प्रशिक्षक नंदिनी देवकर, प्रगती पाटील तालुका समन्वयक मनिषा ठाकूर , भाग्यश्री घसे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जासई शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली.