महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत प्रशिक्षण
By निखिल म्हात्रे | Published: January 21, 2024 04:31 PM2024-01-21T16:31:52+5:302024-01-21T16:32:23+5:30
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध माहिती देण्यात येणार आहे.
अलिबाग : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रायगड ही उद्योग विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून या कार्यालयामार्फत उद्योग वाढीसाठी पूर्ण विविध नावीन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. रायगडात उद्योजकांना शासकीय ठेकेदार कसे बनावे याबाबत चार दिवसीय ई-टेंडरिंग, जेम पोर्टल नोंदणी यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सुरू करण्यात येत आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध माहिती देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन विवेक शिंदे यांच्यामार्फत होणार असून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक, कंत्राटदार बनू इच्छिणारे, बचत गटातील सदस्य, कॉलेज विध्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगेश बनकर, प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक यांनी केले आहे. या प्रशिक्षणाबाबत व इतर प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क ८८८८०८२८११ जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग रायगड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.