शाश्वत विकासाकरिता स्वयंसेवी संस्थांमधील युवकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:36 AM2017-09-03T05:36:15+5:302017-09-03T05:36:23+5:30

मेक इन इंडियाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत.

Training for youths in voluntary organizations for sustainable development | शाश्वत विकासाकरिता स्वयंसेवी संस्थांमधील युवकांना प्रशिक्षण

शाश्वत विकासाकरिता स्वयंसेवी संस्थांमधील युवकांना प्रशिक्षण

Next

- जयंत धुळप ।

अलिबाग : मेक इन इंडियाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या क्षमता बांधणी आणि प्रत्यक्ष काम करण्याकरिता क्षमता वृद्धी अशी नीती स्वीकारून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करता येऊ शकतो, अशा विश्वासातून जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांमधील युवा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती निसर्ग फ्रेण्डशिप असोसिएशन कोकण आणि शाश्वत विकास समन्वय समितीचे प्रमुख योगेश म्हात्रे यांनी दिली
आहे.
जिल्ह्यात २५०पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रांत आणि जिल्ह्याच्या विविध भौगोलिक विभागांमध्ये शाश्वत विकासाकरिता कार्यरत आहेत. हे कार्यकर्ते प्रत्यक्ष कामात कुढेही कमी पडत नाहीत. परंतु स्वयंसेवी संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात काही त्रुटी राहून जातात. अशा त्रुटी दूर करण्याकरिता हे प्रशिक्षण स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरू शकणार आहे. त्यातून युवा संस्थेच्या कामातही सुसूत्रता येऊ शकते. याकरिता स्वयंसेवी संस्थाचे प्रशासकीय दस्तऐवज अद्ययावत करून प्रत्यक्ष कृतीयुक्त उपक्रम सामूहिक व संस्थांतर्गत भूमिका व जबाबदारी अधोरेखित करून उत्तम दर्जाचे शाश्वत विकासात्मक कार्य विभागनिहाय करणे असा यामागचा महत्त्वाचा हेतू
आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या अधिनियम व कायद्यानुसार नवीन आलेल्या सरकारी आदेशाप्रमाणे केंद्रस्तरीय, नीती आयोगाच्या दर्पण अंतर्गत नोंदणी ज्यांनी केलेय त्यांच्यासाठी व ज्यांची करायची राहिली आहे अशांना मार्गदर्शन करणे, धर्मदाय आयुक्तांच्या निर्देशानुसार नोंदी व हिशेब नोंदी करून दाखल करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणे असे मुद्दे या प्रशिक्षणात समाविष्ट करण्यात आले असल्याचे म्हात्रे यांनी पुढे
सांगितले.
येत्या १७, २३, २६ आणि २८ सप्टेंबर रोजी या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन कोकण विकास समन्वय व्यासपीठ, नवीन पनवेल येथे करण्यात येत असून, त्यास युवा स्वयंसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सवात युवा पथनाट्यातून लोकप्रबोधन
अलिबागमधील प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून विविध शासकीय योजना पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडून लोकप्रबोधन केले. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहयोगाने हा उपक्रम करण्यात आला. प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी, प्रीतम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे, अफान गझाली, सुचित जावरे यांनी ही पथनाट्ये सादर केली. ‘वाटचाल रायगडची’ पथनाट्यातून किल्ले रायगड विकास, कामांचे स्वरूप, जलयुक्त शिवार, शेततळे, ४ कोटी वृक्ष लागवड, क्र ीडा संकुल, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांची व विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.

Web Title: Training for youths in voluntary organizations for sustainable development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.