शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आंदोलनामुळे वाहतूककोंडी; नेरळ-माथेरान वाहतूक दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:47 AM

तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी शनिवारी नेरळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे कर्जत-कल्याण आणि नेरळ-माथेरान रस्त्यावरील वाहतूक दोन तास खंडित झाली होती.

कर्जत : तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी शनिवारी नेरळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे कर्जत-कल्याण आणि नेरळ-माथेरान रस्त्यावरील वाहतूक दोन तास खंडित झाली होती. मात्र, आंदोलनामुळे कर्जत-नेरळ-डोणे या कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्यात आली.तालुक्यातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एका हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यातील पहिले रास्ता रोको आंदोलन शनिवारी नेरळ येथील हुतात्मा चौकात झाले. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटना, नेरळ रेल्वे प्रवासी संघटना, नेरळ व्यापारी फेडरेशन, नेरळ ज्येष्ठ नागरिक संघ, नेरळ संघर्ष समिती, उत्तर भारतीय व्यापारी संघ, नेरळ परिसर वारकरी संप्रदाय याशिवाय नेरळमधील रिक्षा संघटना यात जय हनुमान, जय भवानी, जय मल्हार, दामत स्टँड, साई एकविरा, ओंकार मिनीडोअर, हुतात्मा कोतवाल, जय मल्हार, जय अंबे या रिक्षा संघटना तसेच टेम्पो संघटना यांचा सहभाग होता.कर्जत तालुक्यात काम करणारे राष्ट्रीय मानवाधिकार, राजे प्रतिष्ठान, पोलीस मित्र संघटना, कर्जत तालुका आदिवासी संघटना, शिव सहकार सेना, कर्जत बार असोसिएशन, कर्जत मेडिकल स्टोअर असोसिएशन, कर्जत खादी ग्रामोद्योग संघ, नाभिक संघटना, कोतवालवाडी ट्रस्ट, माथाडी कामगार संघटना, अखिल आदिवासी संघ, सकल मराठा क्रांती संघ या संघटना यांचा सक्रि य सहभाग होता. तर अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसह चालक, माथेरानला येणारे पर्यटक त्रस्त होते. आंदोलनानंतर रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.जवळपास ५०० नागरिकांचा सहभागकर्जत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय भालेराव, सुधाकर राठोड आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने दिलेले निवेदन स्वीकारले.जवळपास ५०० हून अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलन झाल्यामुळे कर्जत भागाकडे पंचवटी येथे वाहतूक खोळंबून राहिली होती तर कल्याणकडे दामतपर्यंत नेरळ गावातील सर रस्ते आणि माथेरानकडे नांगरखिंडपर्यंत वाहतूक खोळंबून राहिली होती.कर्जत तालुक्यात सर्वाधिक खड्डे असलेल्या कर्जत-नेरळ-डोणे या कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे काम आंदोलनानंतर सुरू करण्यात आले. रस्त्याचे ठेकेदार पी. पी. खारपाटील यांची वाहने या रस्त्यावर डांबर घेऊन दुरुस्तीच्या कामाला लागली आहेत.रिक्षा, टॅक्सी संघटनांचा सहभागसकाळी ९.१५ वाजता सुरू झालेल्या आंदोलनामुळे कर्जत-कल्याण, नेरळ-माथेरान या रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली. आंदोलनात नेरळमधील सर्व रिक्षा संघटना आणि टॅक्सी संघटना यांनी पाठिंबा देऊन सहभाग घेतल्याने स्थानिक वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी अनुभवास मिळाली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीKarjatकर्जत