शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

वाहतूक पोलिसांची बिकटावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:04 AM

मुंबई-गोवा महामार्ग हा आजही अरुंद अवस्थेत आहे. या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असून, अपघातांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे.

सिकंदर अनवारेदासगांव : मुंबई-गोवा महामार्ग हा आजही अरुंद अवस्थेत आहे. या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असून, अपघातांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाते. वाहतूक सुरळीत ठेवणे, अपघातग्रस्तांना मदत देणे, या व्यतिरिक्त अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी याच महामार्गावर पनवेल ते सिंधुदुर्ग कोकणाच्या तळापर्यंत ठिकठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र, सध्या अनेक नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे बिकट अवस्था झाली आहे. मात्र, याकडे वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.सध्या पनवेल ते कोकणच्या तळापर्यंत सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी मोºयांचे बांधकाम, मातीचे भराव, झाडांची कटिंग अशा अनेक समस्यांना वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे. महामार्गावर होणारी वाहतूककोंडी बेदरकारपणे चालणारी वाहने, ओव्हरलोड वाहतूक, अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदत देण्यासाठी पळस्पे (पनवेल) ते सिंधुदुर्ग-कसाल या ५०० कि. मीटरच्या अंतरापर्यंत पळस्पे, वाळण, महाड कशेडी, चिपळूण, हातखंबा, कसाल अशा सात महामार्ग वाहतूक पोलीस शाखा उभारण्यात आल्या आहेत. या वाहतूक शाखा दिवस-रात्र महामार्गावर नियंत्रण ठेवत असतात. सध्या वाहतूक शाखेचे कर्र्मचारी आणि अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे अवस्था बिकट झाली आहे. मोठ्या संख्येने पद रिक्त असून, या वाहतूक शाखांचे वरिष्ठ ठाण्यातील कार्यालय याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. अशी अवस्था राहिली तर काही दिवसांतच या महामार्ग वाहतूक शाखा बंद करण्याची वेळ येणार आहे.पनवेल ते इंदापूर पहिल्या टप्प्याच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून थांबले आहे. अर्धवट राहिलेल्या या कामामुळे महामार्गाच्या वाहतुकीला नेहमी फटका बसत असून, अपघात-वाहतूककोंडी अशा बºयाच समस्या वाहनचालकांच्या समोर उभ्या आहेत. पावसाळ्यात महामार्गावर झाडे कोसळण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला इंदापूर ते कशेडी, अशी सुरुवात झाली आहे. मातीच्या भरावांची कामे, मोºयांची कामे, इतर छोटी-मोठी कामे सुरू आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यात कामामुळे झालेले वाहनांना अडथळे, हे या कामामध्येही येणारच आहेत. या समस्यांना वाहनचालक तोंड देत असताना, महामार्ग वाहतूक शाखेची मदत ही तेवढीच महत्त्वाची आहे. मात्र, या दरम्यान काम सुरू असलेल्या वाकड, महाड आणि कशेडी महामार्ग वाहतूक शाखेमध्ये अधिकारी आणि कर्मचाºयांची कमतरता फार मोठ्या समस्या निर्माण करणार आहे.वाकण वाहतूक शाखेमध्ये एक अधिकारी आणि कर्मचारी मिळून १९ पदे आहेत. यामध्ये एक अधिकारी काम करत असून, सात कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकाणी १२ पदे रिक्त आहेत. महाड वाहतूक शाखेची तीच अवस्था आहे. तीन अधिकारी आणि ३१ कर्मचाºयांची अशी ३४ची नेमणूक असताना अधिकारी नाहीच, फक्त सात कर्मचारी या ठिकाणी काम करत असून, ३४मधून २७ पद रिक्त आहेत. कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे तीन अधिकारी आणि ४० कर्मचाºयांची अशी ४३ची नेमणूक असताना या ठिकाणी अधिकारी पदरिक्त असून ४० कर्मचाºयांमधून १२ कर्मचारी काम करत आहेत. या ठिकाणी ४३ मधून ३१ पदे रिक्त आहेत. तिन्ही महामार्ग वाहतूक शाखांमधील ९६ पदांपैकी २५ कर्मचारी आणि एक अधिकारी असे २६ काम करत असून, तब्बल ७० अधिकारी आणि कर्मचारी मिळून पदे रिक्त आहेत. सध्याची अवस्था यापुढे राहिली तर काही दिवसांतच या महामार्ग पोलीस वाहतूक शाखा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या वर्षभरात तिन्ही महामार्ग वाहतूक शाखांतर्गत २४७ अपघात झाले असून, ४०० प्रवासी जखमी झाले होते तर ४७ मृत्युमुखी पडले. अशा परिस्थितीत तिन्ही वाहतूक शाखांकडे वरिष्ठ कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पद भरण्याची मागणी१पनवेल ते कोकण तळापर्यंत चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पनवेल-इंदापूर पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर कोकणात जाणाºया चाकरमान्यांना, पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.२दुसºया टप्प्याचे कामदेखील जोरात सुरू आहे. इंदापूर ते चिपळूण या कामामुळे खोदकाम असो, भराव असो, मोºयांची कामे असो व इतर कामे असो, अनेक ठिकाणी महामार्गावर अडथळे, अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी महामार्ग वाहतूक शाखेचे काम महत्त्वाचे ठरणार आहे.३मात्र, रिक्त पदांमुळे महामार्ग वाहतूक शाखा पोलीस शाखेची सेवा कुचकामीठरणार आहे. याचा फटका मात्र वाहनचालक, प्रवासी, पर्यटकांना नक्कीच बसेल तरी वाहतूक शाखा महामार्ग पोलीस वरिष्ठ कार्यालय, ठाणे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्तपदांवर अधिकारी व कर्मचाºयांची लवकरच नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.