जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांचा संप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:01 AM2019-10-04T03:01:37+5:302019-10-04T03:01:54+5:30

जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या बेमुदत असहकार आंदोलनामुळे कंटेनर मालाची वाहतूक पुरती कोलमडली आहे.

transporter strike at JNPT port | जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांचा संप

जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांचा संप

googlenewsNext

उरण : जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या बेमुदत असहकार आंदोलनामुळे कंटेनर मालाची वाहतूक पुरती कोलमडली आहे. वाहतूक थंडावल्याने १२ वाहतूक संघटनांच्या सुमारे १८ हजार ट्रक-ट्रेलर्स परिसर आणि विविध रस्त्यांवर दुतर्फा उभे करण्यात आले आहेत. यामुळे जेएनपीटी बंदर आणि परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. जेएनपीटी बंदरातून कंटेनर मालाची देशभरात वाहतूक केली जाते. बंदरातून कंटेनर माल हाताळणीच्या व्यापारात हजारो आयात-निर्यातदार, शिपिंग कंपन्या, सीएचए, लॉजिस्टिक आॅपरेटर, विविध प्रकारचे काम करणारे ठेकेदार आणि ट्रक-ट्रेलर्सद्वारे देशभरात कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या १२ हून अधिक वाहतूक संघटना कार्यरत आहेत.

Web Title: transporter strike at JNPT port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.