रेवदंडा बाह्यवळण मार्गावर कचरा
By admin | Published: February 11, 2017 04:22 AM2017-02-11T04:22:16+5:302017-02-11T04:22:16+5:30
येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते
रेवदंडा : येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होतो. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबचे निवेदन देऊन या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी के ली आहे.
रेवदंडा बाह्यवळण मार्गावर कचरा टाकण्यात येत आहे, या ठिकाणी बाजूला खाडी असल्याने भरती व उधाणाचे पाणी कचरा पाण्यात नेत असल्याने जलप्रदूषणही होत आहे. मोकाट जनावरे व कुत्री यांचा या भागात सुळसुळाट झाला आहे. अलीकडे परिवहन मंडळाच्या बस याच मार्गावरून जा-ये करत असल्याने ग्रामस्थांना बस या डम्पिंग ग्राऊंडच्या परिसरात ताटकळत बसची वाट पाहवी लागत आहे. या डम्पिंग ग्राऊंडप्रश्नाबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता, गावाला डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा मिळावी म्हणून लेखी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे, जागा उपलब्ध झाल्यास प्रश्न सुटेल, असे सांगितले. (वार्ताहर)