मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:35 AM2018-09-19T04:35:17+5:302018-09-19T04:36:10+5:30

यंदा मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात

Traveling of devotees on the Mumbai-Goa highway, Sukhkar | मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

Next

कार्लेखिंड : कोकणात गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी येतात. यंदा मुंबई-गोवामहामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप झाला आहे.
मुंबई-गोवामहामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली आठ ते दहा वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास तापदायक ठरत होता. विशेषकडून पेण-वडखळ हा सात किलोमीटरचा प्रवास नेहमीच चर्चेत होता; परंतु यंदा गणेशोत्सवाकरिता मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात होते, त्यामुळे हा प्रवास सुरळीत झाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अप्पर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही चांगल्याप्रकारे नियोजन केल्यामुळे या प्रवासात वाहतूककोंडी व अपघातांचे प्रसंग घडले नाहीत.
महामार्गावरील रस्ते दुरुस्तीला पावसाची उघड मिळाल्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास झाला नाही. ऊन आणि रस्त्यांवरील धूळ याची तमा न बाळगता, पोलीस यंत्रणा, पोलीस मित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसले, यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला.

Web Title: Traveling of devotees on the Mumbai-Goa highway, Sukhkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.