माथेरान : माथेरानच्या शेजारील पर्वत रांगेतील पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या नेरळ गावाच्या पाठीमागे असलेला पेब किल्ल्याची ऐतिहासिक ओळख विकट गड अशी आहे. हा किल्ला असंख्य ट्रेकर्सचे आवडते ठिकाण बनले आहे. वर्षाकाठी लाखो ट्रेकर्स या पेब किल्ल्याला भेट देत असतात. याच पेब किल्ल्यावर तीन महिन्यांनंतर पुन्हा याच ठिकाणी ट्रेकर्स पडल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी २ आॅक्टोबर रोजी दुपारी ४.२०च्या सुमारास एक तरु णी येथील दरीत पडल्याची घटना घडली आहे. तिला माथेरान पोलीस व वनविभागाचे शिपाई तसेच नेरळ, माथेरान, कर्जत येथील हायकर्स व तिचे सहकारी यांच्या मदतीने १५० फूट खोल दरीतून रात्री ८ वा. सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.पेब किल्ला हा मुंबई, पुणे येथून जवळचे ट्रेकसाठीचे ठिकाण असल्यामुळे येथे दर वीकेंडला हजारो ट्रेकर्स आपल्या ट्रेकिंगचा छंद पूर्ण करण्यासाठी मुंबईहून लोकलने नेरळ स्थानक येथे येऊन फणसवाडी, नेरळ मार्गे पेब किल्ला सर करण्यासाठी येत असतात. सोमवारी सकाळी ठाणे येथील ट्रेक मेट्स या ग्रुपचा प्रमुख महेंद्र पडाया याने मुंबई येथील २५ ट्रेकर्सचा ट्रेकिंग कॅम्प पेब किल्ल्यावर आयोजित केला होता. ट्रेकिंग पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या ट्रेक मेट्स या ग्रुपमधील आयआयटी केलेली आरुषी ओमप्रकाश जैन (३०, रा. चांदिवली, घाटकोपर, मुंबई) हिचा ट्रेकिंग वेळी गवतातील ठिसूळ मातीवर पाय पडल्याने दरीच्या बाजूला तोल गेल्यामुळे ती मागे पडली. ९ जुलै रोजी झालेल्या दोन ट्रेकर्सच्या अपघाताच्या जागी गडगडत १५० फूट खोल दरीत कोसळली.या घटनेची माहिती माथेरान येथील युवक वैभव नाईकसह हायकर्स देवयानी शेळके यांनी माथेरान पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांनी डॉ. उदय तांबेंना १०८ रु ग्णवाहिकेसह घटनास्थळापासून ६ किमी अंतर असलेल्या माथेरान दस्तुरी नाक्याशेजारील बोरीचे मैदान याठिकाणी हजर राहण्याचे सांगितले. यावेळी वैभव नाईक याने माथेरान, नेरळ, कर्जत या परिसरातील रेस्क्यू टीम सुमित गुरव, प्रशांत पोतदार, संदीप कोळी, अक्षय परब व राजेश शेळके यांना या घटनेची माहिती देऊन रेस्क्यू करण्यासाठी बोलवले होते. त्याचबरोबर माथेरान दस्तुरी नाका येथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई अमोल पाटील, हेड कॉन्स्टेबल रोहिदास मांगुळकर, पोलीस हवालदार सुनील पाटील, वनविभागाचे शिपाई सतीश डोईफोडे तसेच पार्किंग व्यवस्था पाहणारे देवेंद्र कवडे, महेश काळे, दीपक निरगुडा यांना या घटनेची माहिती मिळताच यांनी देखील मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. काळोखात टॉर्च व दोरखंडाच्या साहाय्याने आरुषीला शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढले.दिनेश सुतार यांची अभिमानास्पद कामगिरीपोलिसांना या घटनेची माहिती मिळते न मिळते तोच माथेरानमधील एका खाजगी वृत्त वाहिनीमध्ये काम करणारे दिनेश सुतार यांना या घटनेची माहिती मिळाली.त्या दुर्गम भागात गाडी जाऊ शकत नाही म्हणून दिनेश सुतार यांनी रुग्णवाहिकेची तातडीने व्यवस्था करून लवकरात लवकर डॉक्टर,पोलीस व ट्रेकर्स यांना घटनास्थळापर्यंत पोहचविण्यास सहकार्य करून शेवटपर्यंत या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये सहभागी होऊन या महिलेचा जीव वाचविण्यासाठी सहकार्य केल्यामुळे माथेरानमध्ये सर्व स्तरातून दिनेश सुतार यांचेकौतुक होत आहे.या घटनेची माहिती माथेरान येथील युवक वैभव नाईकसह हायकर्स देवयानी शेळके यांनी माथेरान पोलीस ठाण्यात कळवली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, शोध सुरु के ला.१वनविभाग शिपाई डोईफोडे व पोलीस शिपाई पाटील यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता दुचाकी माथेरान मिनी ट्रेनच्या रेल्वे रु ळावरून रात्रीच्या अंधारात जंगलातून चार किमी अंतर दुचाकीवर डोईफोडे चालक म्हणून स्वार झाले.२आरु षीला जखमी अवस्थेत अगदी वेळेत रुग्णवाहिकेपर्यंत तातडीने आणले. डॉ.तांबे व पायलट अजिंक्य सुतार यांनी १०८ रु ग्णवाहिकेत प्रथमोपचार करून डोक्याला जबर दुखापत झालेल्या आरु षीचा रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला.३तातडीने रायगड हॉस्पिटल येथे हलविण्यास सांगितले. आरु षीच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला रायगड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
किल्ल्यावरून पडलेल्या ट्रेकर तरुणीला जीवदान, १५० फूट खोल दरीतून काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 2:07 AM