कर्जत तालुक्यात तिरंगी लढती
By admin | Published: February 15, 2017 04:47 AM2017-02-15T04:47:42+5:302017-02-15T04:47:42+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे व बारा पंचायत
विजय मांडे / कर्जत
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे व बारा पंचायत समितीचे प्रभाग आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी १११ उमेदवारांपैकी ४४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी २१, तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४६ असे एकूण ६७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. अखेरच्या क्षणी युत्या, आघाड्या स्पष्ट झाल्या. या निवडणुकीत बोटावर मोजण्याइतके अपक्ष उमेदवार आहेत. मात्र, त्यापैकी एकही उमेदवार ‘पॉवरफुल’ वाटत नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत.
या निवडणुकीत पनवेल महापालिका झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राभाग रचनेत बदल झाले व कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषद प्रभाग आणि १२ पंचायत स्ािमती प्रभाग झाले. ६७ उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. सर्वांना निवडणुकीचे वाटप झाल्याने आता सर्व उमेदवार प्राचाराच्या रणधुमाळीत सामील झाले आहेत.
सुरु वातीला शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार, अशा वल्गना त्यांचे पदाधिकारी करत होते; परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेने पक्षाकडून उमेदवारी दिलेले अर्ज काढून घेतल्याने शिवसेना व काँग्रेस युती झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाने आरपीआयशी जुळवून घेऊन दहिवलीतर्फे वरेडीमधील केवळ एक पंचायत समितीची जागा देऊन त्यांची बोळवण केली. शिवाय त्या उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म वेळेवर न मिळाल्याने त्यालाही अपक्ष पण भाजपा, आरपीआय पुरस्कृत म्हणून पक्षाच्या निशाणीशिवाय निवडणूक लढवावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच ठिकाणी तिरंगी, तर केवळ बीड बुद्रुकमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा आणि कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार उभे आहेत; परंतु खरी लढत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे व शिवसेनेचे मनोहर थोरवे यांच्यामध्ये होईल. विशेष म्हणजे, उमरोली सारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्हा परिषद प्रभागात शिवसेनेचा उमेदवार उभा नाही त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, एमएमआयचा एक उमेदवार शेलू पंचायत समितीमधून उमेदवारी लढवीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीबरोबर आघाडी आहे. या सर्वांचे भवितव्य काय? हे २३ फेब्रुवारीला ठरेल.