अजय कदम माथेरान : शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे हा उदात्त हेतू माथेरानच्या बाहेरील परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिसत नाही. डोंगरदºया चढून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.माथेरान डोंगराच्या पायथ्याशी हशाच्या पट्टी आणि गारबट या गावांमध्ये ४ थीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जवळचे शहर म्हणून माथेरानच आहे. त्यामुळे येथील विद्य ार्थी हे पुढील शिक्षणासाठी माथेरानचा डोंगर चढत आहेत. एकूण त्यांना तीन किलोमीटरचा दºयाखोºयांचा डोंगर आणि तिथून तीन किमी माथेरानचा लाल मातीचा रस्ता म्हणजे येऊन जाऊन १२ किलोमीटर हे विद्यार्थी पायपीट करीत आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या मानसिकतेवर व शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचा सामना करत हे विद्यार्थी जोरदार पाण्याच्या प्रवाहामधून वाट काढत हे शिक्षण घेत आहेत. उंच कडा, नागमोडी वळणे, खोल दरीतील पाऊल ठेवण्याएवढी पाऊल वाट पार करत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने गृहपाठ करण्यासाठी वेळ मिळत नाही.त्यांच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे.प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर या शाळेने दिलेल्या माहितीनुसार माथेरानच्या अतिवृष्टीमुळे या पावसाळ्याच्या दिवसात या विद्यार्थ्यांची हजेरी रोडावते त्यामुळे हे विद्यार्थी हुशार असून ही नापास होतात. हे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी माथेरानमध्ये राहावे जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही.आमच्या गावात ४ थीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी आम्हाला माथेरान जवळ असल्याने आम्ही येथे शिक्षण घेतो. हे शिक्षण घेत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उंच डोंगर चढून माथेरानमध्ये यावे लागते त्यामुळे आमची दमछाक होते. आमची शारीरिक आणि मानसिक स्थिती या खडतर प्रवासामुळे बिघडून जाते. आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, सरकारने जर आम्हा आदिवासी लोकांसाठी माथेरानमध्ये वसतिगृह बांधले तर आमचे पुढील शिक्षण सुखकर होईल.- आकाश नरेश खडके,विद्यार्थी, इयत्ता १० वी
आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:40 AM