आदिवासी महिलांची दारू अड्ड्यावर धाड
By Admin | Published: August 21, 2015 11:45 PM2015-08-21T23:45:43+5:302015-08-21T23:45:43+5:30
तालुक्यात बेकायदा गावठी दारू विकली जात असतानाही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गावठी दारू विके्र त्यांवर कारवाईची अनेकदा मागणी केल्यानंतरही
खालापूर : तालुक्यात बेकायदा गावठी दारू विकली जात असतानाही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गावठी दारू विके्र त्यांवर कारवाईची अनेकदा मागणी केल्यानंतरही काहीच दखल घेतली जात नसल्याने आदिवासी महिलांनी पुढाकार घेत गावठी दारू विक्रच्या अड्ड्यावर धाड टाकून दारू जप्त केल्याची घटना वावोशी परिसरात घडली आहे.
जप्त केलेली दारू घेऊन महिला वावोशी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस चौकीला टाळे पाहून दारू कोणाच्या ताब्यात द्यायची, असा प्रश्न महिलांना पडला होता.
खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरातील दुर्गम भागात गावठी दारू विक्र ीचे धंदे खुलेआम सुरू आहेत. स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वावोशी परिसरातील परखंदे, गारमाळ येथील आदिवासी वसाहतींमध्ये गावठी दारूची विक्र ी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वावोशी फाट्यावरील अनेक दुकानांमधूनही बेकायदा देशी दारूची विक्री होत असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत पोलिसांकडे अनेकदा तक्र ारी केल्यानंतरही पोलीस लक्ष देत नसल्याने आदिवासी महिलांनीच आक्रमक पवित्रा घेत दारू अड्ड्यावर धाड टाकून गावठी दारू जप्त केली.
गारमाळ येथील रामा वीर आपल्या झोपड्यात दारू विक्र ी करत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील महिलांनी अनेकदा पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. अखेर महिलांनी आक्र मक भूमिका घेवून वीर याच्या दारू विक्र ी अड्ड्यावर धाड टाकून गावठी दारू जप्त केली. महिलांनी खालापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर खालापूर येथून आलेल्या पोलिसांनी महिलांनी आणलेले दारूचे कॅन आपल्या ताब्यात घेतले. (वार्ताहर)