कांता हाबळे नेरळ : सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. दिवाळीत या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत असून, गुरु वारी रात्री १२ वाजता पाचशेहून अधिक पणत्या प्रज्वलित करून वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाºया वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिविरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या उद्देशाने गतवर्षी पोशीर येथील धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सुरु वात करण्यात आली आहे.कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरुणांनी रात्री १२ वाजता सिद्धगडावरील हुतात्मा ज्योतीस्थळावर सुमारे ५०० पणत्या लावल्याने संपूर्ण परिसर रोषणाईने उजळला होता.शहिदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता मोठ्या संख्येने तरुण या वेळी उपस्थित होते. या वेळी क्र ांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, यांनी हुतात्म्यांविषयी इतिहास सांगत कृतज्ञता व्यक्त केली.या वेळी मानिवली ग्रामपंचायत सदस्य प्रशांत झांजे, परेश भगत, नितीन झांजे, धनेश राणे, हरेश गायकर, किशोर गायकर, मयूर गायकर, अनंता गवळी, किशोर गवळी, रूपेश हाबळे, विकास हाबळे, रघुनाथ हाबळे, राजेश हाबळे, धनेश राणे, अमोल गायकर, आदी उपस्थित होते.>रेल्वेस्थानकाला हुतात्म्यांचे नाव द्या!क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत यांनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत कर्जत रेल्वेस्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल आणि नेरळ रेल्वेस्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्याचा संकल्प या वेळी केला.अनेक तरु ण यासाठी पुढाकार घेणार असून, कर्जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. व याचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
दीपोत्सवातून सिद्धगडावर हुतात्म्यांना श्रद्धांजली, तरुणांचा मोठा सहभाग; पाचशेहून अधिक पणत्या लावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 3:14 AM