घोणसे घाटात तिहेरी अपघात
By admin | Published: March 11, 2017 02:19 AM2017-03-11T02:19:08+5:302017-03-11T02:19:08+5:30
माणगाव राज्यमार्ग ९८ वरील घोणसे घाटामध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या तिहेरी अपघातात २० जणांचे प्राण थोडक्यात बचावले. अपघातामध्ये इनोव्हा कारचे मोठे नुकसान
म्हसळा : माणगाव राज्यमार्ग ९८ वरील घोणसे घाटामध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या तिहेरी अपघातात २० जणांचे प्राण थोडक्यात बचावले. अपघातामध्ये इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले असून नव्याने सुरू झालेल्या नालासोपारा एसटीचेही नुकसान झाले आहे.
म्हसळा शहरातील बिलाल कादरी यांच्या मालकीची इनोव्हा गाडी (एम.एच.०६ बी.ई. ३३११) घेऊन माणगावच्या दिशेने जात असताना घोणसे घाटात एका भरधाव ट्रेलर चालकाने इनोव्हाला जोरदार टक्कर दिली. यानंतर मागे असलेल्या बसलाही ट्रेलर धडकला. बसचालक आर. व्ही. वजे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने चालकासहित, वाहक १७ प्रवासी अपघातात थोडक्यात बचावले. राज्य मार्ग ९७ची क्षमता केवळ नागरी वाहतुकीसाठीच आहे. मात्र, या मार्गावरून दिघी पोर्टकडे जाणाऱ्या अवजड वाहनांचीही वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. अपघातात इनोव्हा चालक बिलाल कादरी याला गंभीर दुखापत झाली असून त्याला माणगाव उपजिल्हा
रुग्णालयात हलविण्यात आले आहे.