अलिबाग : भारतीय स्वातंत्र्याचा ७०वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. त्या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते जिल्ह्याचा प्रमुख ध्वजारोहण सोहळा होणे अपेक्षित होते. मात्र, मेहता गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ््यास गैरहजर राहण्याची पालकमंत्री मेहता यांची ही दुसरी वेळ होती.या ध्वजारोहण सोहळ््यास रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रायगड जिल्हा न्यायाधीश एम. बी. सेवलीकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर, रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन, सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांना भेटून त्यांचा सत्कार केला. या वेळी रायगड जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘आपला जिल्हा’ या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी सूर्यवंशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.>जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदनभारतीय स्वातंत्र्याच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रेमलता जैतू तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.या वेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. या वेळी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.ध्वजवंदन सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ‘नेताजी’ या देशभक्तीपर चित्रपटाचे प्रदर्शन उपस्थितांसाठी करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.>विविध गुणवंताचा जिल्हाधिकाºयांच्या हस्ते गौरवया वेळी विविध क्षेत्रांतील गुणवंत व खेळाडूंचा जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये गुणवंत क्र ीडा संघटक कार्यकर्ता पुरस्कार सुरेश गावंड (शूटिंगबॉल), गुणवंत क्र ीडा मार्गदर्शक पुरस्कार लक्ष्मण गावंड, गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार मेघा परदेशी, गुणवंत पुरुष खेळाडू पुरस्कार सागर वैद्य, जिल्हा युवा पुरस्कार आशिष लाड (रा. दहिवली, ता. कर्जत.), जिल्हा युवती पुरस्कार प्रणिता गोंधळी (रा. चेंढरे, ता. अलिबाग),जिल्हा युवा संस्था पुरस्कार महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान(पाणदिवे, पो. कोप्रोली, ता. उरण), राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व शिष्यवृत्ती क्षितिज कोलेकर (इयत्ता १०वी -९९.४० टक्के), गौरव दिवेकर (इयत्ता १० वी -९९.४० टक्के), सागर भजनवाले (इयत्ता १२वी -९५.२३ टक्के) आणि वैशाली बौद्ध (इयत्ता १२ वी -९४.७७ टक्के), पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) राज्य गुणवत्ता यादी विद्यार्थी-शहरी विभाग-ईशा अमित पालिन्नकर (एच.ओ.सी.एल. स्कूल रसायनी खालापूर),ओम कुलपे (डेव्हिड इंग्लिश मीडिअम स्कूल, अलिबाग), पटेल रिझवान ओसमान (अपेजय स्कूल खारघर),ग्रामीण विभाग -अदिती शरणगोड मुरकोड (प्रिया स्कूल खालापूर), अथर्व रमेश परांजपे (कारमेल इंग्लिश स्कूल), यांचा समावेश आहे.>महाडमध्ये पोलीस पथकाची मनवंदनामहाड : भारतीय स्वातंत्र्य दिन महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासक ीय ध्वजारोहण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मानवंदना दिली.तहसीलदार चंद्रसेन पवार, पो. नि. रवींद्र शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो. नि. आबासाहेब पाटील आदी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.नगरपरिषदेत नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या हस्ते तर पंचायत समितीत सभापती सीताराम कदम यांनी ध्वजवंदन केले. चैतन्य सेवा संस्थेतर्फे शिवाजी चौक येथे भारतमातेचे पूजन करण्यात आले.
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उँचा रहे हमारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:17 AM