महामानवाला त्रिवार अभिवादन; चवदार तळे सत्याग्रहाचा ९१वा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:50 AM2018-03-21T01:50:56+5:302018-03-21T01:50:56+5:30
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केल्याच्या घटनेचा मंगळवारी ९१वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसागर लोटला होता.
महाड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केल्याच्या घटनेचा मंगळवारी ९१वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसागर लोटला होता. चवदार तळे तसेच क्रांतिस्तंभावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, प्रदेश काँँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आदींंनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. आंबेडकर सभागृहात बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने श्रमणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेबांचे सत्याग्रह चळवळीतील सहकारी दलितमित्र सुुुरबानाना टिपणीस यांच्या निवासस्थानासमोर या सैनिक दलातर्फे मानवंंदना देण्यात आली.
आ. भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे आदींनी महामानवाला अभिवादन केले.