दासगाव : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि महाड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर नेहमीच केमिकल सांडते. मात्र रस्त्यावर केमिकल सांडवणाऱ्या वाहनांवर अद्याप कोणत्याच खात्याकडून कारवाई होताना दिसत नाही. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहतीतील मल्लक या कारखान्यातून निळ्या रंगाचे के मिकल पिशव्यांमध्ये भरून उघड्या ट्रकमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे नेत असताना त्या ट्रकमधून निळ्या रंगाचे केमिकल रस्त्यावर सांडले. याबाबत आसनपोई गावातील ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार महाड औद्योगिक पोलिसांची त्याला अडवून तो ट्रक ताब्यात घेतला.केमिकल कोणत्याही प्रकारचे असो ते घातकच असते. चिपळूण औद्योगिक वसाहत आणि महाड औद्योगिक वसाहतीतून टाकावू केमिकल हे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे दर दिवस मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाने टँकर आणि ट्रकद्वारे नेले जाते. मात्र या वाहतुकीदरम्यान योग्य काळजी घेतली जात नसल्याने ते रस्त्यावर सांडते. त्यामुळे नागरिक तसेच प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. सध्या जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणाºया महाडवासीयांना रस्ता प्रदूषणाचाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्ता प्रदूषणामुळे अनेक वेळा केमिकलच्या गळती वासाने उलट्या झालेल्या आहेत. तर अनेक नागरिक चक्कर येवून देखील पडल्याच्या घटना ताज्या आहेत. ज्याप्रमाणे वायू आणि जल प्रदूषण थांबवण्याचे नाव घेत नाही. आता या प्रदूषणाला देखील संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रशासन आरटीओ, पोलीस प्रशासन किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येकजण कारवाईसाठी एकमेकांवर बोट दाखवण्याचे फक्त काम करत असल्याने या केमिकलचा त्रास नागरिकांच्या जीवाशी येवून बसला आहे. कोणतीच कारवाई नसल्याने केमिकलची वाहतूक करणारे चालक निर्ढावले आहेत.शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशालिटी या कारखान्याचा वेस्ट मॅनेजमेंट मुंबई येथे पाठवण्यात येणारा निळ्या रंगाचा केमिकल पिशव्यामध्ये भरून ट्रक क्र. एमएच ०४ जीएफ ३५९३ हा निघाला. भरलेला केमिकल हा ओला असल्याने यातून मोठ्या प्रमाणात निळ्या रंगाचा केमिकल पाण्याची गळती होवून तो संपूर्ण रस्त्यावर सोडून लागला. याच परिसरातील आसनपोई गावातील नागरिकांनी औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र दखल घेत काही अंतरावरचा मुंबई - गोवा महामार्गावर नडगाव हद्दीत त्या ट्रकला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणून औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाला याची माहिती दिली.>कठोर कारवाईची मागणी : जल आणि वायू प्रदूषणामुळे महाडकर जनता हैराण झाली आहे. केमिकल वाहतूक करणाºया वाहन चालक मालक आणि बेजबाबदारपणे वागणाºया कारखान्यांवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. आसनपोई गावच्या नागरिकांच्या तक्रारीनुसार हा ट्रक ताब्यात घेवून त्यात असलेल्या केमिकलचे नमुने तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर कारवाईचा विचार करण्यात येईल.
रस्त्यावर केमिकल सांडणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:02 AM