रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक १५० फूट दरीत कोसळला; आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती
By कुणाल गवाणकर | Published: January 8, 2021 07:15 PM2021-01-08T19:15:55+5:302021-01-08T21:33:40+5:30
चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रकला अपघात; घटनास्थळी मदतकार्य सुरू
रायगड: वऱ्हाडाचा ट्रक १५० फूट दरीत कोसळल्याची घटना रायगडमधील कुडपान गावाजवळ घडली आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक दरीत कोसळला. पोलादपूरहून लग्न सोहळा उरकून वऱ्हाडी मंडळी ट्रकमधून निघाली होती. हा ट्रक पूर्णपणे भरलेला होता. सध्या घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीनं मदतकार्य सुरू असून आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर ६५ जण जखमी झाले आहेत.
पोलादपूरमधील लग्न सोहळा उरकून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकला कुडपान गावाजवळ अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक १५० फूट दरीत कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक पोलीसदेखील दुर्घटनास्थळी पोहोचले. पोलादपूर पोलीस आणि ट्रेकर्सदेखील मदतीसाठी पोहोचत आहेत. अंधार पडल्यानं मदतकार्यात अडचणी येत आहेत.
Maharashtra: Two dead, 65 injured after their truck fell into a gorge in Kudpan village of Raigad district earlier this evening. The injured have been taken to Poladpur rural hospital. They were returning from a wedding when the incident took place. More details awaited. pic.twitter.com/yIiCnn7XlN
— ANI (@ANI) January 8, 2021
दरीत कोसळलेल्या ट्रकमध्ये असलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. 'खेडच्या तहसीलदारांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. आसपास असलेल्या रक्तपेढ्यांशी आणि रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मदतकार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,' असं चौधरी यांनी सांगितलं.