मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक-ट्रेलर अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:16 AM2021-03-11T00:16:21+5:302021-03-11T00:16:42+5:30

केमिकलच्या ड्रममुळे स्फोट होऊन उडाला भडका

Truck-trailer accident on Mumbai-Pune expressway; Burn both vehicles | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक-ट्रेलर अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक-ट्रेलर अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खोपोली : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३७ आडोशी पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने चाललेल्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर लेन क्रॉस करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडकला. या धडकेने दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. ट्रकमध्ये असलेल्या केमिकलच्या ड्रममुळे स्फोट होऊन आग आणखीनच भडकत होती. त्यामुळे द्रुतगती मार्ग बराच काळ बंद ठेवावा लागला होता. सात ते आठ तासानंतर आग आटोक्यात आली.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस -बोरघाट, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, अफसकॉन कंपनी यांनी मदत कार्य केले. खोपोली नगरपालिका, उत्तम गॅलव्हा आणि अन्य अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मदतकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा जीव धोक्यात घालून घटनास्थळी होत्या. आगीचा उठणारा भडका, स्फोटकासारखे उडणारे ड्रम, धुराचे लोट, पसरलेल्या दुर्गंधीमध्ये सर्वच यंत्रणा मेहनत घेत होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य या घटनेत मदत करत आहेत. ही घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू आहे.

आग एवढी प्रचंड होती की त्यामुळे आजूबाजूच्या गवताला आग लागून त्याचे वणव्यात रूपांतर झाले. आगीमुळे खोपोली शहरातील अनेक भागात जमा झालेल्या धुरामुळे स्वयंपाकाच्या गॅसची फ्लेम लालसर होत असल्याचे अनेक कॉल खोपोली गॅस एजन्सीमध्ये येत असल्याची माहिती गॅस एजन्सीचे मालक उदय साखरे यांनी दिली.

Web Title: Truck-trailer accident on Mumbai-Pune expressway; Burn both vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.