धाटावमध्ये ट्रक जाळला

By admin | Published: March 21, 2017 02:01 AM2017-03-21T02:01:45+5:302017-03-21T02:01:45+5:30

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर उभ्या असलेल्या ट्रकला रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने

The truck was burnt in old age | धाटावमध्ये ट्रक जाळला

धाटावमध्ये ट्रक जाळला

Next

धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर उभ्या असलेल्या ट्रकला रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे ट्रक चालक-मालक वर्गाबरोबर लगतच्या वसाहत असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये ट्रकचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून या प्रकाराची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
रविवारी १९ मार्च रोजीच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अनंता सानप (रा.वरसगाव,रोहा) यांचा एम.एच.०४ ए एल ९४७३ क्र मांकाचा रिकामा ट्रक धाटाव औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यावर गेली ३ ते ४ दिवसांपासून उभा होता. मात्र या ट्रकला रविवारी अज्ञात व्यक्तींकडून आग लावून जाळण्यात आला.
वीजवाहिनी पडल्याने टेम्पो खाक-
रोहा : रोहा-कोलाड मार्गावरील वरसे गावाजवळ गादी, उशा वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोवर अचानक विजेची तार पडल्याने टेम्पो जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या लागलेल्या आगीमुळे रोहा शहर व वरसे परिसरातील वीजपुरवठा तब्बल चार तास खंडित झाला होता. दरम्यान, मागील पाच दिवसांत कोलाड (पुई) येथील भंगार गोडावून, रोहा खारी रोडवरील धनसे कॉम्प्लेक्समधील गादी कारखाना तर वरसे येथील ही तिसरी घटना आहे. तालुक्यात आगीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वरसे येथील नाक्यावर गादी, उशा घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोवर अचानक विजेची तार पडल्याने स्पार्किंग होऊन ठिणगी गादी उशीवर पडताच आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.
या आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या दुर्दैवी घटनेमुळे शहर व वरसे परिसरात चार तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

Web Title: The truck was burnt in old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.