काटेरी ‘केंड’ची सत्यता ‘लोकमत’ने केली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:00 PM2019-07-12T23:00:26+5:302019-07-12T23:00:31+5:30

अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टचा घेतला शोध: व्हायरल करणाºया सुधीर आपटेंशी संवाद

The truth of the Kateri 'Kand' has been made by 'Lokmat' | काटेरी ‘केंड’ची सत्यता ‘लोकमत’ने केली उघड

काटेरी ‘केंड’ची सत्यता ‘लोकमत’ने केली उघड

Next

संतोष सापते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीवर्धन : सोशल मीडियावर व्हायरल झालेला केंड ही अफवा असल्याचा निर्वाळा प्राणिमित्र शैलेश ठाकूर यांनी दिल्यानंतर केंडसदृश माशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाºया व्यक्तीचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

श्रीवर्धनमधील रहिवासी सुधीर आपटे यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी ते स्वत: काढलेले फोटो ‘लोकमत’ प्रतिनिधीला दाखवले. हा मासा एक फूट लांब व सहा इंच रुंद असल्याचे आपटे यांनी सांगितले. त्याच्या अंगावर सर्वत्र काटे होते यावरून तो काटेरी केंड आहे का? अशी विचारणा सोशल मीडियावर फोटो टाकून के ली होती. मात्र, या माझ्या पोस्टचा विपर्यास होऊन हा केंड मासा असल्याचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवले. त्यामुळे हा मासा केंड जातीचा असल्याची अफवा पसरली. श्रीवर्धन समुद्रात आढळणारे काटेरी केंड आकाराने लहान असतात; परंतु हा मासा मोठा होता त्यामुळे तो केंड नसल्याचे मला नंतर समजल्याचे सुधीर आपटे यांनी स्पष्ट केले.

या माशाला गुरु वारी सकाळी ८.३० वाजता नगरपालिका स्वच्छता कर्मचारी जगन्नाथ भगत व विलास गुरव यांनी समुद्राच्या धूपप्रतिबंधक बंधाराच्या दगडावर टाकले होते. सुधीर आपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हा मासा मृत अवस्थेत होता, त्यामुळे त्याला पूर्ववत पाण्यात सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाने या माशाविषयी विपर्यास वृत्त प्रसिद्ध केले आहे.
वास्तविक केंड हा मासा विषारी माशांच्या वर्गात मोडतो, त्यामुळे त्याला कोणीही स्पर्श करत नाही. गुरु वारी सापडलेल्या माशाची प्रजाती कोणती हे अद्याप समजू शकलेले नाही.

मासा आढळला नाही
शैलेश ठाकूर यांनी गुरु वारी सकाळी ११ ते दु. १२.३० या वेळेत समुद्रावर माशाचा शोध घेतला; सहा फूट आकाराचा मासा शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वास्तविक अंदाजे एक ते दीड फूट असलेला मासा दगडात टाकल्यामुळे दृष्टीस पडला नाही.

Web Title: The truth of the Kateri 'Kand' has been made by 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.