शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: September 3, 2016 02:20 AM2016-09-03T02:20:16+5:302016-09-03T02:20:16+5:30

शाळेच्या गणवेषासाठी पैसे नसल्याने सतत वर्ग शिक्षिकेने तगादा लावून मानिसक छळ केल्या प्रकरणी सोनाळे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या एका विद्यार्थाने विषारी औषध प्राशन

Trying to succumb to a tired teacher | शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Next

वाडा : शाळेच्या गणवेषासाठी पैसे नसल्याने सतत वर्ग शिक्षिकेने तगादा लावून मानिसक छळ केल्या प्रकरणी सोनाळे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या एका विद्यार्थाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ठाणे येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ माजली असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रोशन बाळू भोये (१६) असे त्या विद्यार्थाचे नाव आहे. वाडा तालुक्यातील सोनाळे येथे न्यु इंग्लिश स्कूल हे विद्यालय आहे. येथे ५ वी ते १० पर्यंतचे वर्ग आहेत. या विद्यालयात सोनाळे या गावातील रोशन बाळू भोये हा विद्यार्थी इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. यावर्षी येथील सर्व विद्यार्थांच्या शाळेचा गणवेषामध्ये बदल केल्याने प्रत्येक विद्यार्थाकडून ५७० रूपये देण्याचे ठरले होते. मात्र गरीब व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोशन याच्याकडे द्यायला पैसे नव्हते.
वर्ग शिक्षिकेने त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून पैशासाठी त्याला शिक्षा दिली जात होती. पैसे न आणल्यास शाळेत येवू नकोस असा दम वर्ग शिक्षिका एम. टी. पाटील यांनी रोशन याला सोमवारी शाळेत दिला होता. याचा पश्चाताप रोशनला झाल्याने त्याने कंटाळून शाळे शेजारीच असलेल्या तिळसा या गावी सोमवारी दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सामान्य रूग्णालय ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रोशनचे वडील बाळू भोये यांनी दिली. दरम्यान, पैशांकरीता वडीलांना घाबरवण्यासाठी मी विषारी औषध प्राशन केल्याचा जबाब रोशनने वाडा पोलीस ठाण्यात दिला असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक टी. ए. पाटील यांनी दिली आहे. एकंदर या वृत्तामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. (वार्ताहर)

मुख्याध्यापक म्हणतात गरिबांना माफी
यासंदर्भात न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक टी.के.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या शाळेच्या युनिफॉर्मला गेली ५० वषेॅ झाल्याने यावषीॅ युनिफॉर्मात बदल करण्यात आला असून त्यासाठी प्रत्येक विद्यार्थाला पैसे द्यायचे होते. मात्र गरीब विद्यार्थीसाठी सूट देण्यात आली होती. अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पैशांकरीता वडीलांना घाबरवण्यासाठी मी विषारी औषध प्राशन केल्याचा जबाब रोशनने वाडा पोलीस ठाण्यात दिला असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक टी. ए. पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Trying to succumb to a tired teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.