- वैभव गायकरपनवेल : जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. साहाजिकच रास्त भाव धान्याचे सर्वात जास्त लाभार्थी पनवेलमध्ये आहेत. मात्र अनेक महिन्यांपासून रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली असल्याने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.ऑनलाईन नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना रेशनच्या धान्य दुकानदारांकडून दिले जाते. दोन रुपये प्रतिकिलो गहू व तीन किलो प्रतिकिलो तांदूळ अशा दराने हे धान्य लाभार्थ्यांना मिळते.कोरोना काळात मोफत वितरित केलेली तूरडाळ रेशन दुकानातून पुन्हा गायब झाली आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला, नोकऱ्या गेल्या. यावेळी तब्बल सहा महिन्यापासून घरी बसलेल्या लाभार्थ्यांना रेशन धान्याचा मोठा आधार मिळाला. काही दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्य देण्यास टाळाटाळ केली तर काही दुकानदारांनी प्रामाणिकपणे रेशन धान्य वितरित केले. पनवेल तालुक्यात एकूण १९३ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत.कोरोना काळात काही दुकानदारांनी मोफत तूरडाळ वितरित केली तर काहींनी चणाडाळ वितरित केली. मात्र पुन्हा रेशन दुकानादातून तूरडाळ गायब झाल्याचे दिसून येत आहे.
रेशन दुकानावर काय मिळते रेशन दुकानावर गहू , तांदूळ मिळतो. दोन रुपये प्रतिकिलो गहू व तीन किलो प्रतिकिलो तांदूळ अशा दराने हे धान्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात येते. कोरोना काळात शासनाच्या माध्यमातून तूरडाळ तर काही ठिकाणी चणाडाळ वितरित करण्यात आले होते. डाळ नसल्याची तक्रार कुठे ?पनवेल तालुक्यात सर्वच ठिकाणी डाळ नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात १९३ रेशनची दुकाने आहेत. या ठिकाणी डाळीचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.पनवेलमध्ये शासनामार्फत दोन महिन्यापासून तूरडाळीचा पुरवठा झालेला नाही. कोरोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळीचे वितरण केले होते.-मधुकर बोडके (जिल्हा पुरवठा अधिकारी,रायगड