हातपाटी वाळू व्यवसाय बंद

By admin | Published: October 12, 2015 04:52 AM2015-10-12T04:52:44+5:302015-10-12T04:52:44+5:30

वर्षभर बंद असलेल्या हातपाटी वाळू व्यवसायाला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र खणीकरणाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या हातपाटी वाळू व्यवसायाला एकच महिन्याची

Turn off the handpump sand business | हातपाटी वाळू व्यवसाय बंद

हातपाटी वाळू व्यवसाय बंद

Next

दासगांव : वर्षभर बंद असलेल्या हातपाटी वाळू व्यवसायाला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र खणीकरणाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या हातपाटी वाळू व्यवसायाला एकच महिन्याची उपसा करण्यास परवानगी मिळाली होती. त्या उपशाची मुदतही शनिवारी (१० आॅक्टोबर) रात्री १२ वाजता संपल्याने वाळू व्यावसायिक व यावर अवलंबून असणारे मजूर तसेच बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला महाड तालुक्यातील सावित्री खाडीतील हातपाटी वाळू व्यवसाय गेले वर्षभर संपूर्णपणे बंद होता. मात्र शासनाचा बुडत असलेला महसूल व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचा विचार करीत अखेर शासनाने हातपाटी वाळू व्यवसायावरून बंदी उठवली व उपसा करण्यास परवानगी दिली. मात्र परवानगीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर परवानगीसाठी लागणाऱ्या या व्यवसायाला संबंधित अनेक कार्यालयांतील परवानग्या (नाहरकत दाखले) दिल्यानंतरच वाळू उपसा करण्यासाठी रीतसर रॉयल्टी उपसा परवाना देण्यात आला. मात्र गौनखणीकरणाचा वर्षाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या वाळू उपशाला फक्त एकच महिन्याची परवानगी मिळाली होती.
या परवानगीच्या काळातदेखील गणेशोत्सव आल्यामुळे जवळपास १७ दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने मुदतवाढ करून देण्यात आली होती. मात्र त्याची ही मुदत शनिवारी रात्री संपल्याने हातपाटी वाळू व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अडणीत आले आहेत.
हातपाटी वाळू व्यवसायाला शासनाकडून परवानगी असली तरी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या परवानगीसाठी कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत नवीन उपसा परवाना मिळत नाही. नवीन परवान्याच्या नियमानुसार महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड, मुंबई यांनी इन्लॅन्ड व्हसल अ‍ॅक्ट १९१७ नुसार बोटी रजिस्टर करण्यास सांगितल्याने पुन्हा वाळू व्यवसाय अडचणीत आला
आहे.
वर्षभर बंदीच्या काळात ज्या बांधकाम व्यावसायिकांनी चोरटी वाळू घेऊन बांधकाम पूर्ण केले २४ महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकांना ५० लाख ७६ हजार ८२२ रुपये दंड महाड तहसीलदारांनी ठोठावल्याने सध्या बंद झालेल्या या वाळूमुळे महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले मजूरही हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Turn off the handpump sand business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.