कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील कथित बोगस जमीन मोजणीप्रकरणी कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाकडून चौकशी अहवाल सादर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून, दोषी अधिकाºयाला वाचवण्यासाठी भूमी अभिलेखचे अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप पीडित शेतकºयाने केला आहे.
कर्जत येथील खाड्याचा पाडा येथील सर्व्हे क्र .१८/६ बोगस जमीन मोजणीप्रकरणी नेरळ पोलीस स्थानकात दोन महिन्यांपूर्वी तक्र ार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक व मोजणी अधिकारी यू. डी. केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित शेतकरी मालू बाळू डायरे यांनी केली आहे. तसेच याबाबत रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग यांच्याकडेही तक्र ार दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर दोन महिने उलटूनही उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी नेरळ पोलिसांना पुढील कार्यवाही करण्यात अडचण येत आहे.आर्थिक नुकसान झाल्याने या शेतकºयावर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. इतका गंभीर विषय असतानाही कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहेत. गेले अनेक दिवस हे पीडित शेतकरी भूमी अभिलेखच्या कर्जत व अलिबाग कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाºयांकडे विचारणा करत आहेत. या दोन्ही प्रकरणांत अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग यांनी चौकशी आदेश दिलेले असतानाही कर्जत भूमी अभिलेखचे अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने बघत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. या प्रकरणी काय कार्यवाही करण्यात आली, याची व्यवस्थित माहिती दिली जात नाही. लेखी पत्रव्यवहार करूनही दाद दिली जात नाही, असे शेतकरी मालू बाळू डायरे यांनी सांगितले.सर्व्हे नं.१८/६ संदर्भात मोजणी प्रकरणाबाबत पत्रव्यवहार केला आहे. अद्याप भूमी अभिलेखकडून अहवाल प्राप्त झाला नाही, तसेच सर्व्हे क्र.१९/३ जमीन मोजणी व बिनशेती प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशीची कार्यवाही सुरू केली. मात्र, ही मोजणी व नकाशा इ. कागदपत्रे बोगस आहेत अथवा नाही, याबद्दल अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाने द्यायचा आहे. मात्र, अद्याप कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे या प्रकरणाचा अहवाल सादर करता येत नाही.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतया प्रकरणी मोजणी अधिकारी यू. डी. केंद्रे हे दोषी असल्याचे आमच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. दोषी व्यक्ती ही भूमी अभिलेख खात्याचा अधिकारी असल्याने याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाºयांना गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी कळवले होते. मात्र, अद्यापही या विभागाकडून प्रतिसाद नाही.- सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, नेरळया प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाशिवाय चौकशी करता येत नाही. अधीक्षक, भूमी अभिलेख, अलिबाग यांच्याकडून २५८ नुसार चौकशी आदेश मिळाल्यानंतरच चौकशी करता येईल.- इंद्रसेन लांडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, कर्जतबोगस जमीन मोजणी प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात, तसेच कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक व मोजणी अधिकारी यू. डी. केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे. तसेच अधीक्षक, भूमी अभिलेख, अलिबाग यांच्याकडेही तक्र ार दाखल करण्यात आली आहे. मात्र, दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही व आम्हाला न्याय मिळाला नाही. आमचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.- मालू बाळू डायरे,शेतकरी