चिरनेरच्या आदिवासी वस्तीत आढळला साडेबारा फुट लांबीचा, ५० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 05:04 PM2023-09-28T17:04:29+5:302023-09-28T18:02:35+5:30
चिरनेरच्या आक्कादेवी आदिवासी वस्तीतील प्राथामिक शाळेजवळील भिंतीलगत भक्ष्याच्या शोधात मंगळवारी साडेबारा फुट लांब आणि सुमारे ५० किलो वजनाच्या भलामोठा अजगर आला होता.
मधुकर ठाकूर
उरण : तालुक्यातील चिरनेरच्या आक्कादेवी आदिवासी वस्तीतील प्राथामिक शाळेजवळ मंगळवारी भला मोठ्ठा अजगर आढळून आला होता. शाळेजवळच्या भिंतीजवळ साडेबारा फुट लांब आणि सुमारे ५० किलो वजनाच्या भल्या मोठ्या इंडियन पायथॉन जातीच्या अजगराला सर्पमित्र राजेश पाटील यांनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले.
चिरनेरच्या आक्कादेवी आदिवासी वस्तीतील प्राथामिक शाळेजवळील भिंतीलगत भक्ष्याच्या शोधात मंगळवारी साडेबारा फुट लांब आणि सुमारे ५० किलो वजनाच्या भलामोठा अजगर आला होता. याबाबत माहिती मिळताच चिरनेर -भोम येथील सर्पमित्र राजेश पाटील यांनी शाळेजवळ जाऊन पाहणी केली.हा साडेबारा फुट लांबीचा अजगर भक्ष्याच्या शोधार्थ नागरी वस्तीत आला असल्याचे त्यांना आढळून आले.या भल्यामोठ्या अजगराला सर्पमित्र राजेश पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या शिताफीने आणि सुरक्षितरित्या पकडले.त्यांनतर अजगराची वनविभागाला माहिती देण्यात आली. अजगर सुरक्षित असल्याची पडताळणी केल्यानंतर चिरनेर येथील इंद्रायणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दाभाटी वनक्षेत्रात नेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.