अलिबाग समुद्र पाहून 'त्या' वीस जणी झाल्या अचंबित; बेकरी व्यवसायातून जम्मू काश्मीर खोऱ्यातील महिला सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:13 PM2023-01-19T14:13:04+5:302023-01-19T14:14:06+5:30

महाराष्ट्रातील बेकरी पदार्थाची माहिती मिळावी आणि त्यातून आपल्या बेकरी व्यवसायात नवे पदार्थ निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील असीम फाऊंडेशन जम्मू काश्मीर मधील २० जणींना पुणे, अलिबाग दोऱ्यावर आणले होते.

Twenty people were surprised to see the Alibag sea; Empowering Women of Jammu and Kashmir Valley through Bakery Business | अलिबाग समुद्र पाहून 'त्या' वीस जणी झाल्या अचंबित; बेकरी व्यवसायातून जम्मू काश्मीर खोऱ्यातील महिला सक्षम

अलिबाग समुद्र पाहून 'त्या' वीस जणी झाल्या अचंबित; बेकरी व्यवसायातून जम्मू काश्मीर खोऱ्यातील महिला सक्षम

Next

अलिबाग : हाताला काम नाही, घरातील कुटुंबाच्या खण्या पिण्याची व्यवस्था करण्यात दिवस मावळला जात होता. अशी परिस्थिती जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा, पुंज, लाम, बग्गा, कुपवारा या गावातील महिलांची होती. पुणे येथील असीम फाऊंडेशनने भारतीय सैन्याच्या साथीने जम्मू काश्मीर खोऱ्यामधील या गावातील महिलांच्या हाताला बेकरी उत्पादन निर्मितीचा रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे आज शेकडो महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. पहिल्यांदाच २० जणींचा समूह अलिबाग येथे असीम फाऊंडेशनच्या मदतीने आला होता. समुद्राच्या पहिल्यांदाच घेतलेल्या दर्शनाने या महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. रायगडातील वातावरण, समुद्र, निसर्गआणि भोजन आवडल्याचे या महिलांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बेकरी पदार्थाची माहिती मिळावी आणि त्यातून आपल्या बेकरी व्यवसायात नवे पदार्थ निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील असीम फाऊंडेशन जम्मू काश्मीर मधील २० जणींना पुणे, अलिबाग दोऱ्यावर आणले होते. जम्मू काश्मीर हा बर्फाळ प्रदेश असल्याने या महिलाना समुद्राचे मोठे आकर्षण होते. अलिबागचा समुद्र पाहून सर्वच महिलाना आनंद झाला होता. अलिबाग विश्रामगृह येथे माहिती देण्याबाबत असीम फाऊंडेशन तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जम्मू काश्मीर मधील महिलांशी संवाद साधण्यात आला. असीम फाऊंडेशन चे प्रशांत घारे, हेमांगी भाटे यांनी त्याच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर या महिलांनी अलिबाग मधील प्रसिद्ध मयूर बेकरीला भेट दिली.

असीम फाऊंडेशन तर्फे सिमाभागातील महिलाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काम करीत आहेत. जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा, पुंज, लाम, बग्गा, कुपवारा या भागातील महिलाना असीम फाऊंडेशनने बेकरी उत्पादन रोजगार सुरू करून दिला आहे. त्यामुळे पूर्वी हाताला काम नसल्याने त्याचा वेळ फुकट जात होता. मात्र आता आमच्या हाताला काम मिळाल्याने कमाई पण होत आहे आणि समाधान ही मिळत असल्याचे पुंज मधील रिंपी देवी हिने सांगितले. जम्मू काश्मीरमधील महिलाना बेकरी काढून देण्यात आली असून सफरचंद, अक्रोडपासून विविध पदार्थ बनविले जातात. या महिलांच्या बेकरी पदार्थांना पुणेसह राज्यात मोठी मागणी असल्याने असीम फाऊंडेशनतर्फे ते विकले जात आहेत. भारतीय सैनिकांनाही या बेकरी मधून पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. 

आठ विरनारी महिला बेकरीतून सक्षम
जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा या गावातील प्रकाशशो देवी, विणा देवी या महिलेसह सहा महिलांचे पती भारतीय सैन्य दलात देशाचे रक्षण करीत होते. आठ ही महिलांच्या पतीना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुढील आयुष्य कसे जगावे हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. अशातच असीम फाऊंडेशनच्या मदतीने आठ महिलाना एकत्रित करून वीरनारी बेकरी सुरू केली आहे. बेकरी व्यवसायातून आठही विरनारी आपल्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. सर्व महिला ह्या साठ वर्ष वयावरील आहेत.

पहिल्यांदाच घेतले समुद्राचे दर्शन
जम्मू काश्मीर हे पृथ्वी वरील स्वर्ग मानले जाते. प्रत्येक जण एकदा काश्मीरमध्ये जाण्यास उत्सुक असतो. जम्मू काश्मीर मधील महिलाना समुद्राचे मोठे आकर्षण आहे. अलिबाग समुद्र पाहून वीस ही महिला आनंदित झाल्या होत्या. महाराष्ट्रीय जेवण ही खूप स्वादिष्ट असल्याचे महिलांनी सांगितले. समुद्राचे पहिल्यांदाच दर्शन घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
 

Web Title: Twenty people were surprised to see the Alibag sea; Empowering Women of Jammu and Kashmir Valley through Bakery Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग