अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतीण गड; व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:40 AM2020-02-01T00:40:13+5:302020-02-01T00:40:24+5:30

कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला आहे.

two and half year girl waved indian flag in kalavantin fort | अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतीण गड; व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा दिला संदेश

अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतीण गड; व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा दिला संदेश

Next

अलिबाग : तालुक्यातील लोणारे गावातील अडीच वर्षाच्या शर्विका म्हात्रे हिने कर्जत-माथेरानमधील किल्ले प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताक दिनी सर केला. शर्विकाने गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावत समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. आईवडिलांच्या सोबत शर्विकाने हा सुळका सर केला आहे. शर्विकाने अवघ्या अर्ध्या तासात सुळका चढून सर केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यापूर्वी शर्विकाने ११ किल्ले सर केले आहेत.
कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला आहे. तो चढण्यासाठी साधारण तीन तासांचा अवधी लागतो. तेथून कलावंतीण सुळका चढण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. कलावंतीण गड चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्यावरून हा सुळका थेट आभाळात भिडल्याचे जाणवते. त्याच्या बाजूला खोल दरी आहे. शर्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे, तिने सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरु ड-जंजिरा, पद्मदुर्ग, उंदेरी कलावंतीण दुर्ग असे ११ किल्ले - गड सर केले आहेत. शर्विकाच्या धाडसाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
शर्विकाने गड सर करताना शिवरायांवर आधारित ओव्या, पोवाडे, भूपाळ्या म्हणत कलावंतीणीचा सुळका गड सर केला. शर्विकाला आपल्या आईवडिलांकडूनच हा वारसा मिळाला आहे. शर्विकाचे आईवडील शिक्षक असून, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्यही आहेत.
गड-किल्ले सर करण्याआधीच पूर्व तयारी तसेच योग्य त्या खबरदारीचे उपाय, नियोजन करण्यात येत असल्याचे शर्विकाचे वडील
जितेन म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: two and half year girl waved indian flag in kalavantin fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड