बोर्ली मांडला : मुरुड तालुक्यातील म्हाळुंगे खुर्द येथील प्राथमिक शाळेजवळील जंगल भागात झालेल्या गोळीबारातील दुसरा आरोपी महेंद्र पवार यास रेवदंडा पोलिसांनी महाड तालुक्यातील वाडा येथे अटक केली. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी अल्पवयीन असून त्याला फणसाड अभयारण्यातून अटक केली आहे. पूजा पालवणकर (रा. महाळुंगे खुर्द, ता. मुरुड) २० जुलै २०१५ ला सायंकाळी सहाच्या सुमारास महाळुंगे येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणापलीकडे असणाऱ्या जंगल मैैत्रिणींन बराबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी झुडपाआडून संदीप वाघमारे (३७), महेंद्र पवार, सहदेव ठाकूर, नयनेश वाघमारे (चौघेही रा. महाळुंगे आदिवासी, ता. मुरुड) यांनी एकत्र येत ठासणीच्या बंदुकीतून प्रकाश रातवडकर यांच्याबरोबरील पूर्ववैैमनस्यातून त्यांची मुलगी सायली रातवडकर हिच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर हे सर्वजण फरार झाले होते. मात्र संदीप वाघमारे यास २५ जुलै २०१५ ला चोरढे येथील जंगल भागात अटक केली होती. मात्र उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू होता. रेवदांडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र पवार हा महाड तालुक्यातील वाडा येथे असल्याचे समजले, त्याच वेळी पथकासह वाडा येथे जावून महेंद्र पवार यास अटक करून रेवदंड्यात आणले. (वार्ताहर)
म्हाळुंगे गोळीबार प्रकरणी दोघे अटकेत
By admin | Published: December 15, 2015 12:54 AM