शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

मुलींनीच जन्मदात्यांना संपवलं... रायगडमध्ये दोन महिलांच्या हत्या प्रकरणाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:35 AM

रायगड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात मुलींनीच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Crime News : महाराष्ट्रात दोन हादरवून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. राज्यात दोन मुलींनीच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्या धक्कादायक प्रकार घडला. कुठे प्रेम प्रकरणातून तर कुठे संपत्तीच्या वादातून या दोन हत्येच्या घटना घडल्या. आईची हत्या करणाऱ्या मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही घटना या रायगड जिल्ह्यातील असल्याचे समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यात १० ते १३ सप्टेंबर दरम्यान या दोन्ही घटना घडल्या असून दोन मुलींना स्वतंत्र खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत प्रियकरासोबत अश्लिल चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा दाबून खून केला होता. ही धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात घडली. हत्येनंतर आईने आत्महत्या केल्याचा बनाव मुलगी आणि तिच्या प्रियकराने केला होता. मात्र, दुसऱ्या मुलीने तो बनाव उघड केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली.

१० सप्टेंबर रोजी संगीता झोरे (४२) यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यांची हत्या मुलगी भारती झोरे (२०) आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर या दोघांनी केली. संगीता यांनी पहाटे आपल्या मुलीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर भारतीने तिचा प्रियकर संतोषसोबत आईचा जीव घेतला. भारतीने आईचे हात-पाय पकडून ठेवले आणि संतोषने ब्लँकेटने संगीता यांचा गळा आवळून खून केला. यानंतर दोघांनी मिळून मृतदेह छताच्या पाईपला लटकवला. त्यानंतर संगीता यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र भारतीच्या धाकट्या बहिणीने ही संपूर्ण घटना गुपचूप पाहिली होती. या घटनेनंतर तीन दिवसांनी तिने याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. यानंतर खालापूर पोलिसांनी भारती आणि संतोषला अटक केली.

दुसरी घटना ही १३ सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये घडली. प्रिया नाईक नावाच्या महिलेचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला होता. त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत होता. मृत प्रिया नाईक यांनी जीव वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला असल्याचे शवविच्छेदनातून समोर आलं आहे. दोरीसारख्या वस्तूने गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर नातेवाईकांची चौकशी सुरू केली असता मुलीनेच आईच्या हत्येची सुपारी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं.

पनवेल शहर पोलिसांनी प्रिया नाईक यांची हत्या करणाऱ्या प्रणिता, विवेक पाटील व निशांत पांडे या तिघांना अटक केली आहे. आईकडून बाहेर फिरण्यासाठी तसेच मोबाईल वापरण्यासाठी निर्बंध येत असल्याने प्रणितानेच वैतागून आपल्या आईची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. प्रणिताचे पतीसोबत पटत नसल्याने ती गेल्या वर्षभरापासून माहेरी पनवेल येथे राहत आहे. यादरम्यान, प्रणिताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुद्धा निर्माण झाले आणि काही कारणामुळे  तुटले होते. त्यामुळे प्रिया नाईक यांनी प्रणिताच्या बाहेर येण्याजाण्यावर, फोनवरून बोलण्यावर बंधने घातली होती. आईकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रणिता वैतागली होती. त्यानंतर प्रणिताने मानलेला भाऊ आरोपी विवेक पाटील याला १० लाखांची आईच्या हत्येची सुपारी दिली. विवेकने त्याचा मित्र निशांत पांडे याच्या मदतीने १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरात कोणी नसताना प्रिया नाईक यांचा वायरने गळा आवळून खून केला. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस