रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’; पल्स पोलिओ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:39 AM2021-01-30T01:39:44+5:302021-01-30T01:40:01+5:30

३१ जानेवारीला शून्य ते पाच या वयातील ३२ हजार बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे

'Two drops of life' to 32 thousand children in Raigad district; Pulse Polio Campaign | रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’; पल्स पोलिओ मोहीम

रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’; पल्स पोलिओ मोहीम

Next

निखिल म्हात्रे

अलिबाग : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या आदेशानुसार येत्या ३१ जानेवारी जिल्ह्यातील शहरी भागात सुमारे ३२ हजार बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. पोलिओच्या डोसमुळे बालकांना आजारापासून मुक्ती मिळणार आहे. चिमुकल्यांसाठी दोन थेंब जीवनाचे असणार आहेत.

३१ जानेवारीला शून्य ते पाच या वयातील ३२ हजार बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या बालकांना १९७ बुथवर पल्स पोलिओ लस देण्यात येईल. प्रत्येक बुथवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येणार आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी एसटी बसस्थानके, बाजार, यात्रा, धार्मिक स्थळे, प्रवासातील लाभार्थी, खासगी दवाखाने या ठिकाणी बूथ ट्रान्झिट टीम व मोबाइल टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दीड महिन्यांपासून पोलिओचे डोस
प्रत्येक मुलाला जन्मानंतर १ ते २ दिवसांत व त्यानंतर दीड महिन्यापासून पोलिओचे डोस द्यावेतच. प्रत्येक महिन्यास एक याप्रमाणे ५ डोस द्यावेत. अर्धा तास आगे-मागे अंगावर पाजू नये. नाहीतर लसीचा परिणाम कमी होऊ शकतो.  लस उन्हात ठेवली असेल, त्या लसीची शक्ती कमी होत जाते. ही बर्फाच्या थंड वातावरणात  ठेवण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात ५४ ट्रांझिट टीमव्दारे बस स्टँड, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व १२ मोबाइल टीमव्दारे भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहे.? - डाॅ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक 

Web Title: 'Two drops of life' to 32 thousand children in Raigad district; Pulse Polio Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.