शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

वनविभागाचे दोन कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:34 AM

महिला वनाधिकारी, वनपाल यांचा समावेश; ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

अलिबाग : फर्निचर बनविण्याचे काम करणाऱ्या पाच सुतारांवर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ३० हजार रुपयांची लाच घेताना वडखळ वनविभागाच्या वनाधिकारी ललिता सुभाष सूर्यवंशी आणि वनपाल बापू बिरू गडदे या दोघांना रायगड लाचलुचपत विभागाच्या टीमने रंगेहाथ पकडले.तक्रारदार हे खेड येथील भारत स्वा मीलमधून पासींग लाकूड खरेदी करून लाकडी वस्तू तयार करून देतात. स्वा मीलमधून खरेदी केलेल्या लाकडांचा साठा करण्याचा परवाना न घेता तक्रारदार व त्यांच्याच गावातील चार सुतार फर्निचर बनविण्याचे काम करतात. या पाच जणांवर विनापरवाना फर्निचर बनविण्याचा ठपका ठेवून कारवाई करण्याचे नाटक वडखळ वनविभागाच्या वनाधिकारी ललिता सूर्यवंशी आणि वनपाल बापू गडदे यांनी केले. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक सुताराकडून या दोघांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली, यामुळे या पाच सुतारांकडून एकत्रितपणे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.या दरम्यान तक्रारदारांनी याबाबतची तक्रार रायगड लाचलुचपत विभागाकडे केली. तक्रारदाराच्या तक्रारीची शहानिशा करून अँटीकरप्शनने सापळा रचला. लाचेची मागणी करून लाचखोर वनाधिकारी आणि वनपाल यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदारांनी या दोघांना ३० हजार रुपये देण्यासाठी दिवस ठरवण्यात आला. यादरम्यान पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ, पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस हवालदार दीपक मोरे, पोलीस हवालदार बळीराम पाटील, महेश पाटील, विशाल शिर्के , पोलीस नाईक सुरज पाटील आणि स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना रंगेहाथ अटक केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण