पोलादपूरमध्ये दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:56 AM2017-11-23T02:56:10+5:302017-11-23T02:56:22+5:30
पोलादपूर : बांधकाम साहित्याचे पैसे देण्या-घेण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलादपूरमध्ये घडली आहे.
पोलादपूर : बांधकाम साहित्याचे पैसे देण्या-घेण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलादपूरमध्ये घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटांतील ११ जण जखमी झाले असून, एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. परस्परविरोधी तक्रारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील हनुमाननगरमधील अंकुश पवार (४०) मटेरियल सप्लायर्स यांनी संजय जाधव याच्याकडे बांधकाम साहित्याचे पैसे मागितल्याने त्यांच्या रागातून संजय जाधव याने राकेश चव्हाण, स्वप्निल जाधव, शुभम जाधव, संतोष चव्हाण, संदेश चव्हाण, मुन्ना चव्हाण, मधुकर जाधव आदींना सोबत घेऊन संगनमताने अंकुश पवार यांची मुले अनिकेत व प्रथमेश यांची मोटारसायकल अडवून त्यांना तसेच अंकुश पवार, विकास पवार, विलास पवार, अर्जुन पवार, लहू पवार, शकुंतला पवार यांना शिवीगाळी, दमदाटी करून प्रसंगी वीट फेकून मारीत, मारहाण करून जखमी केले.
या हाणामारीत ७ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. या प्रकरणी अंकुश पवार यांनी प्रथम पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
दुसºया गटातील संजय जाधव (२७, कॉन्ट्रक्टर, रा. हनुमाननगर, पोलादपूर) याने पहिल्या गटाच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विकास पवार, अंकुश पवार, लहू पवार, प्रथमेश पवार, अनिकेत पवार, अभिषेक पवार तसेच अर्जुन पवार, विलास पवार, बाळू पवार अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
प्रसंगी सर्व आरोपी अटकेत असल्याचे पोलिसांनी सांगून झालेल्या मारहाणीत संदेश चव्हाण, राकेश चव्हाण, आई शोभा, आत्या मंगल असे चार जण जखमी झाले. त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास रोहा येथील डीवायएसपी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार हे करीत
आहेत.