चिंचवली भागात दोन घरफोड्या, नागरिक भयभीत : २३ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:49 AM2017-11-16T01:49:16+5:302017-11-16T01:49:41+5:30
खोपोली शहरातील चिंचवली भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वावोशी : खोपोली शहरातील चिंचवली भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खोपोली शहरातील चिंचवली भागात अनेक मोठमोठे गृहसंकुल उभे राहिले आहेत. या ठिकाणी अनेक कुटुंब नोकरीनिमित्त बाहेरु न येवून वास्तव्यात आहेत. मात्र सुटीच्या दरम्यान अनेक कुटुंब मूळ गावी जात असल्याने त्याचा फायदा घेवून या भागात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी येथील सरस्वती नगरमधील गृहसंकुलात अनिल रामचंद्र कोंडाळकर व त्यांच्या पत्नी सारिका हे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यात आहेत. त्यांचे मूळ गाव पोलादपूर असून सध्या ते चिंचवली येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी अनिल यांची पत्नी पनवेल येथे माहेरी गेल्याने घरात एकटेच राहण्यापेक्षा ते ही घराला कुलूप लावून या भागातच वास्तव्यास असणाºया भावाकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी रात्रीच्या दरम्यान रूमचे कुलूप तोडून घरातील कपाट फोडून त्यातील दोन सोन्याच्या अंगठ्या व गल्ल्यात साठवून ठेवलेली जवळपास पावणेतीन हजाराची रोकड घेवून या ठिकाणाहून पोबारा केला. त्यानंतर याच भागात दुसºया इमारतीत ही एका रूमचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. काही दिवसापूर्वीच येथील कुटुंब घर सोडून गेल्याने घरात कोणीच नसल्याने येथून चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. या घटनेतील अनिल रामचंद्र कोंडाळकर यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जवळपास २० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व पावणे तीन हजाराची गल्ल्यातील रक्कम असा एकूण २३ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.