महामार्गावर विचित्र अपघातात दोन जखमी

By Admin | Published: June 8, 2015 11:11 PM2015-06-08T23:11:57+5:302015-06-08T23:11:57+5:30

भरधाव वेगात असणाऱ्या कारचालकाने अचानक गाडी थांबवल्याने त्याच्या मागून येणाऱ्या बसने या कारला मागून जोरदार धडक दिली.

Two injured in a strange accident on the highway | महामार्गावर विचित्र अपघातात दोन जखमी

महामार्गावर विचित्र अपघातात दोन जखमी

googlenewsNext

खालापूर : मुंबई-पुणे दु्रतगती मार्गावर माडप येथील बोगद्यानजीक झालेल्या अपघातातील वाहनाची पाहणी करण्याकरिता भरधाव वेगात असणाऱ्या कारचालकाने अचानक गाडी थांबवल्याने त्याच्या मागून येणाऱ्या बसने या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. बसच्या पाठीमागून येणाऱ्या तीन वाहनांनी एकमेकांना पाठीमागून धडक दिल्याने पाच गाड्यांचा विचित्र अपघात घडून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी दुपारी हा अपघात घडला.
मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रविवारी दुपारी बोलेरो जीपचा (एम.एच.४३, ए.एन. २८५७) अपघात घडून महामार्गाच्या बाजूला विचित्र अवस्थेत पडून होती. सोमवार, ८ जून रोजी सकाळी ७ च्या सुमारास मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती कार (एम.एच. ०२ पी.एन. ८४१२) या कारमधील चिन्मय देशपांडे (२४, रा. नवी मुंबई) याने माडप बोगद्याजवळ आले. त्यावेळी त्याच्या नजरेस ही अपघातातली जीप निदर्शनास आल्याने ती पाहण्याकरिता अचानक ब्रेक लावून गाडी थांबवल्याने त्याच्या पाठीमागून येणाऱ्या एसटीने (एम.एच. ४३ एच. ४४६६ ) चिन्मयच्या कारला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. अपघातात चिन्मय व त्याचा सोबती विनीत गांधी (२४) हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातादरम्यान बसच्या पाठीमागे भरधाव वेगात असणाऱ्या कार व त्याच्या मागे असणाऱ्या होंडा सीटी कार याही एकमेकांवर आदळल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
४नागोठणे : अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला ठोकर दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथील रु ची हॉटेलनजीक घडली. विठ्ठल घोगरे (६०, रा.पिंगोवी,सिंधुदुर्ग ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घोगरे हे पेण येथे नोकरी करीत होते. रात्रीच्या दिवा-रोहे रेल्वेने ते नागोठणेत येवून महामार्गावरून चालत घरी येत असताना हॉटेलनजीक एका वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी जाणारे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद लाड यांना मृत इसम तेथे आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Two injured in a strange accident on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.