तीन अपघातांत २ ठार, ८ जखमी

By admin | Published: December 25, 2015 02:32 AM2015-12-25T02:32:38+5:302015-12-25T02:32:38+5:30

पाली - खोपोली मार्गावर पेडली गावाजवळ बुधवारी दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर सात प्रवासी जखमी झाले.

Two killed, 8 injured in three accidents | तीन अपघातांत २ ठार, ८ जखमी

तीन अपघातांत २ ठार, ८ जखमी

Next

पाली : पाली - खोपोली मार्गावर पेडली गावाजवळ बुधवारी दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर सात प्रवासी जखमी झाले.
गणपतीपुळ्यावरून दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या होंडासिटीची पालीकडे येणाऱ्या मारुती झेनबरोबरच जोरदार ठोकर झाली. अपघातात मारुती झेनमधील पाच प्रवाशांपैकी नसीम इम्राईन भाटकर (३२) या महिलेचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले. होंडासिटीमधील चार जखमींना परळी येथील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
कंटेनरची पादचाऱ्याला धडक
महाड : महाड शहराजवळ महामार्गावर मोहोप्रे पुलाच्या वळणावर भरधाव कंटेनरने पादचाऱ्याला धडक लागली. मात्र पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात नथू किसन पवार (३६) हा जखमी झाला असून, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली.

Web Title: Two killed, 8 injured in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.