लोणेरेजवळ अपघातात दोन ठार

By admin | Published: July 14, 2016 02:09 AM2016-07-14T02:09:46+5:302016-07-14T02:09:46+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेनजीक रेपोली गावच्या हद्दीत कारने समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिली व मागून येणारा कंटेनर पुन्हा या कारवर आदळला

Two killed in an accident near Lonare | लोणेरेजवळ अपघातात दोन ठार

लोणेरेजवळ अपघातात दोन ठार

Next

दासगांव/महाड : मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेनजीक रेपोली गावच्या हद्दीत कारने समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिली व मागून येणारा कंटेनर पुन्हा या कारवर आदळला. बुधवारी सकाळी ८.३० वाजता घडलेल्या या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ गावातील एक कुटुंब स्वत:च्या स्विफ्ट कार (एमएच०८आर२५०९) ने माणगांव ते म्हाप्रळ असा प्रवास करीत होते. लोणेरेनजीक रेपोली गावच्या हद्दीत सकाळी ८.३० च्या दरम्यान रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या एका कंटेनर (एमएच०६-७५५३) ला मागून ओव्हरटेक करीत असताना समोरून दापोली ते मुंबई जाणाऱ्या एसटी बस (एमएमच२०बीएल३२६७) यावर समोरून धडकली. या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील हुसैन मुकादम (६५), आयशा मुकादम (५५, रा. म्हाप्रळ) हे दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर खुर्शीद मुकादम हे एक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमीला मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून, या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)


रोहा : मुुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, मंगळवारी कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. हा अपघात पुई पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे झाला आहे. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाहनचालकाचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही. मंगळवारी मालवाहू कंटेनर
(एमएच०१एन१९६७) हा रात्री रत्नागिरीवरून मुंबईच्या दिनेश जात असताना कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत आला व वाहनचालकाला रस्त्याचा अंदान न आल्याने त्याचा वाहनावरून ताबा सुटला, त्यातच कंटेनर पलटी झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु वाहनाचे नुकसान झाले. मालवाहू कंटेनर रस्त्याच्या खालील बाजूला कलंडल्याने त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवासीवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु जर पुई पुलाला संरक्षक कठडे असते तर कंटेनर पलटी झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पुईजवळील पुलाला संरक्षक कठडे उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Two killed in an accident near Lonare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.