शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

लोणेरेजवळ अपघातात दोन ठार

By admin | Published: July 14, 2016 2:09 AM

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेनजीक रेपोली गावच्या हद्दीत कारने समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिली व मागून येणारा कंटेनर पुन्हा या कारवर आदळला

दासगांव/महाड : मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेनजीक रेपोली गावच्या हद्दीत कारने समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिली व मागून येणारा कंटेनर पुन्हा या कारवर आदळला. बुधवारी सकाळी ८.३० वाजता घडलेल्या या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ गावातील एक कुटुंब स्वत:च्या स्विफ्ट कार (एमएच०८आर२५०९) ने माणगांव ते म्हाप्रळ असा प्रवास करीत होते. लोणेरेनजीक रेपोली गावच्या हद्दीत सकाळी ८.३० च्या दरम्यान रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या एका कंटेनर (एमएच०६-७५५३) ला मागून ओव्हरटेक करीत असताना समोरून दापोली ते मुंबई जाणाऱ्या एसटी बस (एमएमच२०बीएल३२६७) यावर समोरून धडकली. या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील हुसैन मुकादम (६५), आयशा मुकादम (५५, रा. म्हाप्रळ) हे दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर खुर्शीद मुकादम हे एक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमीला मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून, या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)रोहा : मुुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, मंगळवारी कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. हा अपघात पुई पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे झाला आहे. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाहनचालकाचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही. मंगळवारी मालवाहू कंटेनर (एमएच०१एन१९६७) हा रात्री रत्नागिरीवरून मुंबईच्या दिनेश जात असताना कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत आला व वाहनचालकाला रस्त्याचा अंदान न आल्याने त्याचा वाहनावरून ताबा सुटला, त्यातच कंटेनर पलटी झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु वाहनाचे नुकसान झाले. मालवाहू कंटेनर रस्त्याच्या खालील बाजूला कलंडल्याने त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवासीवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु जर पुई पुलाला संरक्षक कठडे असते तर कंटेनर पलटी झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पुईजवळील पुलाला संरक्षक कठडे उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.