बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहतीमधील पंचतारांकित क्षेत्रामध्ये गुरांसाठी गवत कापण्याकरिता गेलेल्या वेरखोले गावातील दोघांचा सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर वेरखोले परिसरातील ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेपर्यंत संबंधित मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
महादेव पवार (५०) आणि संकेत तांबे (३५ रा. वेरखोले) हे सकाळी गुरांसाठी लागणारे गवत कापण्यासाठी आमशेत सोलम कोंड परिसरात गेले असता, सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास या परिसरात विजेच्या तारांचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वेरखोले परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, या ठिकाणी आलेल्या पोलीस प्रशासन तसेच वीज मंडळाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना घेराव घालून या घटनेविरोधात संताप व्यक्त के ला. निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याकडून अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले होते. वीज मंडळाच्या कारभाराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत असून, वीज मंडळाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतले जाणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यामुळे परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक बंद करण्यात आली होती.मृतदेह आरोग्य कें द्रातमहादेव पवार, संके त तांबे या दोघांचे मृतदेह येथील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणण्यात आले.ग्रामस्थ आक्रमक झाल्याने महावितरणच्या एका अभियंत्यासह तीन कर्मचाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.