तीन विविध अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2015 01:45 AM2015-12-24T01:45:12+5:302015-12-24T01:45:12+5:30

महाड तालुक्यातील बिरवाडी पुलावरून दुचाकी कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे.

Two killed in three different accidents | तीन विविध अपघातांत दोन ठार

तीन विविध अपघातांत दोन ठार

Next

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी पुलावरून दुचाकी कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे. सैन्य दलात कार्यरत बळीराम मोरे (२५) रा. निगडे फणसेकोंड हे आपल्या दुचाकी (एमएच ०६ बीएच ६४२२) ही घेवून बिरवाडीकडून निगडे येथे जात असताना बिरवाडी मच्छी मार्केट पुलावर तोल जावून ती खाली पडली. या अपघातात मोरे व मित्र अजय दबडे (२४) हे दोघे जखमी झाले. या घटनेनंतर बिरवाडी येथील बळीराम मोरे यांना पुढील उपचाराकरिता मुंबई येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
आॅक्टोबर २०१५ मध्ये बिरवाडी मच्छी मार्केट पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यानंतर या पुलावरून आजही वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाला आहे.
जिल्हा नियोजनमधून या पुलाच्या कामाकरिता १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती नुकत्याच झालेल्या मासिक सभेत बिरवाडी सरपंच शीतल तांबे यांनी दिली होती. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Two killed in three different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.