घरफोड्या करणाऱ्या दोघा ओला चालकांना पेणमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:44 AM2018-08-11T05:44:05+5:302018-08-11T05:44:13+5:30

दिवसा ओला चालक तर रात्री बँका व पतपेढ्यांमध्ये घरफोड्या करून ऐवज लंपास करणा-या ओला चालक भूषण पवार आणि विनोद देवकर या दोघांना अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे.

Two motorists arrested from the pen | घरफोड्या करणाऱ्या दोघा ओला चालकांना पेणमधून अटक

घरफोड्या करणाऱ्या दोघा ओला चालकांना पेणमधून अटक

Next

- जयंत धुळप 
अलिबाग : दिवसा ओला चालक तर रात्री बँका व पतपेढ्यांमध्ये घरफोड्या करून ऐवज लंपास करणा-या ओला चालक भूषण पवार आणि विनोद देवकर या दोघांना अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयाने २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे ओला सेवेच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.
ओलाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी बँका व पतसंस्थांमध्ये अनेक चोºया केल्या असून, बुधवारी रात्री ते पेण न्यायालयात चोरी करण्याकरिता ओलाने येणार असल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्या ओला टॅक्सीची तपासणी केली असता दोन लोखंडी कटावण्या, हॅक्सॉब्लेड, दोन स्क्रू ड्रायव्हर आदी घरफोडीची हत्यारे मिळाली. तपासात दोघांनी वडखळ, पोलादपूर येथील दाखल गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात अलिबाग, नागाव येथील दोन बंगल्यांचे कुलूप, रसायनी व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील मायक्र ो फायनान्सचे आॅफिस, खेडमधील एच.पी. गॅसचे आॅफिस, टीव्ही शोरूम, दापोली येथील टीव्ही शोरूम, कल्याण
येथील पतपेढीच्या तसेच आचरा, सिंधुदुर्ग येथील तीन बंगल्यांचे कुलूप तोडून चोरी केल्याची व इतर
ठिकाणी चोरी व घरफोडी
करण्याचा प्रयत्न केल्याची
कबुली दिली. एकूण ११ गुन्ह्यांप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

>कोकणातील गुन्ह्याचीही उकल!
भूषण मूळचा दापोलीचा आहे, तर विनोद मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील असून, २००९ पासून त्यांच्यावर मुंबईत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विनोदची बालगुन्हेगार म्हणून नोंद आहे. घरफोड्या केल्याप्रकरणी वडखळ, पोलादपूर आणि अलिबाग पोलीसांत गुन्हे दाखल आहेत. दोघांनाही प्रथम वडखळ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक केले असून त्यांच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्ह्यांचीही उकल होणार आहे.

Web Title: Two motorists arrested from the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड