पोलादपूरजवळ बसला कंटेनरची धडक, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:12 AM2018-08-18T03:12:14+5:302018-08-18T03:12:24+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत पार्लेवाडी येथे शुक्रवारी सकाळी कंटेनर व एसटी बसची जोरदार ठोकर झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत पार्लेवाडी येथे शुक्रवारी सकाळी कंटेनर व एसटी बसची जोरदार ठोकर झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची महाड आगाराची बस (एमएच १४ बीटी २५९८) पोलादपूरकडून महाडकडे जात असताना सकाळी सव्वादहाच्या सुमारास खेड बाजूकडे भरघाव वेगाने मार्गस्थ होणाऱ्या कंटेनरचालकाने (एमएच ४६ बीबी ४७२९) रस्त्याच्या परिस्थिती व समोरून येणाºया एसटीकडे दुर्लक्ष केले. यामुळे कंटेनरची बसला जोरदार ठोकर बसली. या अपघातात बसमधील चालक नारायण सुतार व सहायक बारटक्के हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाड आगाराची एक बस ब्रेक डाऊन झाली असता पोलादपूरला दुसरी बस देण्यासाठी व नादुरु स्त बस दुरु स्त करून परत आणण्यासाठी नारायण सुतार व बारटक्के हे गेले होते. ते परत येत असताना पार्ले गावाजवळ कंटेनरची ठोकर बसली. यात सुतार यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे तर मदतनीस बारटक्के यांच्या पायाला मार लागला असून ग्रामीण रु ग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले. बस नादुरु स्त असल्याने यात प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता टळली. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून कंटेनर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कोलाडजवळ अपघातात पादचाºयाचा मृत्यू
रोहा : मोठमोठे खड्डे, चुकीचे दिशादर्शक फलक, अतिवेगामुळे मुंबई-गोवा महामार्ग दिवसेंदिवस आणखीनच धोकादायक ठरत आहे. कोलाड तळवली (वाण्याची) येथील बळीराम चंदर पवार यांचा अपघातात सोमवारी रात्री मृत्यू झाला.
कोलाड वाण्याची तळवली येथील बळीराम चंदर पवार (४५) व लक्ष्मण अंकुश जाधव (४0) हे मुंबई-गोवा महामार्गावरील तळवली हद्दीतून सोमवारी रात्री पायी जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात बळीराम पवार यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून कोलाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.