धुळवड खेळून आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा उल्हासनदीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 11:07 PM2019-03-21T23:07:14+5:302019-03-21T23:07:29+5:30

उल्हास नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या पाषाणे जवळ दोघांचा बुडून मृत्यू झाला.दोन्ही तरुण असून धुळवड साजरी करून आंघोळीसाठी उल्हासनदीवर पोहचले होते.दरम्यान,बुडालेल्या तरुणांमध्ये एक मुंबई घाटकोपर येथील आहे.

Two people who went to wash bathing with Dhulwad were drowned in Ulhasnand and died | धुळवड खेळून आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा उल्हासनदीत बुडून मृत्यू

धुळवड खेळून आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा उल्हासनदीत बुडून मृत्यू

Next

 - कांता हाबळे

नेरळ -  उल्हास नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या पाषाणे जवळ दोघांचा बुडून मृत्यू झाला.दोन्ही तरुण असून धुळवड साजरी करून आंघोळीसाठी उल्हासनदीवर पोहचले होते.दरम्यान,बुडालेल्या तरुणांमध्ये एक मुंबई घाटकोपर येथील आहे.

 आज सर्वत्र धुळवड साजरी केली जात असून दिवसभर विविध रंगांचा आनंद घेतल्यानंतर बहुतेक धुळवड प्रेमी नदीवर जाऊन आंघोळी करतात.पाषाणे या रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गावात ध्रुव रेसिडेन्सी असून त्या ठिकाणी राहणारे शामनाथ सिंग यांच्याकडे त्यांचे नातेवाईक मुंबई घाटकोपर येथून आले होते. कुटुंबातील सर्वांनी होळी चा आनंद घेतल्यानंतर आंघोळीसाठी तेथून जवळच असलेल्या उल्हासनदीवर पोहचले.दुपारी दीडच्या सुमारास विनय शामनाथ सिंग आणि देवेंद्र बिध्यय सिंग हे नदीमध्ये पोहता पोहता खोल पाण्यात गेले आणि बराच वेळ बाहेर येत नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला.स्थानिक लोकांनी शोध घेऊन त्या दोघांचा ठावठिकाणा लागत नसल्याने शेवटी नेरळ पोलिसांना कळविण्यात आले.नेरळ पोलिसांनी याबाबत जिल्हा पोलिसांना कळविल्यानंतर खोपोली येथून आपद्ग्रस्त मदतीसाठी या ग्रुपचे पोहणारे यांना पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Two people who went to wash bathing with Dhulwad were drowned in Ulhasnand and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.