कैद्यांना मोबाईल पुरवल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:17 PM2020-11-10T23:17:11+5:302020-11-10T23:17:25+5:30
काहीच दिवसांपूर्वी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले होते.
रायगड : अलिबागच्या उपकारागृहतील कैद्यांना मोबाईल पुरवल्या प्रकरणी दोन कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. सुभेदार अनंत भेरे आणि शिपाई सचिन वाडे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. काहीच दिवसांपूर्वी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले होते.
कोरोनाच्या कालावधीत अलिबागमधील कारागृहात थेट कैद्यांना ठेवण्यात येत नव्हते. यासाठी अलिबाग नगरपालिका शाळेत उप कारागृह उभारण्यात आले होते, अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली होती, त्यानंतर गोस्वामी यांच्या सह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना याच उप कारागृहात ठेवण्यात आले होते, गोस्वामी हे कारागृहातुन समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.
दरम्यान, कारागृहातील निलंबीत करण्यात आले ल्या कर्मचाऱ्यांचा या प्रकरणी काही संबंध नाही, अशी माहिती अलिबाग कारागृहाचे अधिक्षक ए. टी. पाटील यांनी लोकमतश बोलताना दिली. उप कारागृहातील अन्य कैद्यांना मोबाईल पुरवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, गोस्वामी यांच्या मोबाईल वापराबाबत चौकशी सुरू आहे असेही त्यांनी सांगितले,