शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

माणगावमधील सिलिंडर स्फोट: भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 3:29 AM

कारखान्यावर कारवाईची मागणी

माणगाव : विळेभागाड औद्योगिक परिसरामध्ये क्रिप्टझो क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. या कारखान्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बॉयलर सिलिंडर स्फोटात भाजलेल्या १८ जखमींपैकी आशिष येरुणकर (रा. म्हसेवाडी), राकेश हळदे (रा. उंबर्डी) यांचा शनिवारी मृत्यू झाला. चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कारखान्यात आॅक्सिजन सिलिंडर बनविण्याच्या चाचणीवेळी स्फोट झाला.कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी करण्यात आल्याप्रकरणी परिसरात ग्रामस्थांनी तसेच मृत कुटुुंबीयांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन व शासकीय अधिकारी नुकसानभरपाई जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले. माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे आदींनी कंपनीला भेट दिली. कंपनी २०१५ पासून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मशीन मेकिंग शॉपचे लायसन्स होते. मात्र, टेस्टिंगची परवानगी नव्हती.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीसंतप्त ग्रामस्थांनी, कंपनी व्यवस्थापनासह संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी कामगारांना कंपनी व्यवस्थापन नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. त्या वेळी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या संचालकांशी संपर्क झाला नसून कामगारांच्या हलगर्जीप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय नुकसान भरपाईसाठीही पाठपुरावा करणार असून याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनीसुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे दिघावकर यांनी सांगितले. तर,रायगडचे कंपनी निरीक्षक अंकुश खराडे व केशव केंद्रे यांनी, कंपनीला मशीन मेकिंग शॉपचे लायसन्स देण्यात आले होते. मात्र, टेस्टिंगसाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा.लि. कंपनी या कंपनीला मेकिंग मशिनरीची परवानगी फेब्रुवारी २०१९ मध्ये दिली आहे. यात चालणारी सिलिंडर रिफिलिंगची प्रोसेस वैध असून, कंपनीत त्यांनी केलेली चाचणी अवैध आहे. या चाचणीकरिता कंपनीने आवश्यक परवानगी घेतली नव्हती.- अंकुश खराडे, कंपनी निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, रायगड