बसमधील बॉम्ब प्रकरणी दोन हजार जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:34 AM2019-06-05T03:34:40+5:302019-06-05T03:35:00+5:30

तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच नाही : माहितीच्या आधारे आरोपीचे काढले जातेय छायाचित्र

Two thousand people inquired about the bomb in the bus case | बसमधील बॉम्ब प्रकरणी दोन हजार जणांची चौकशी

बसमधील बॉम्ब प्रकरणी दोन हजार जणांची चौकशी

Next

अलिबाग : कर्जत-आपटा या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याच्या घटनेला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही तपास यंत्रणेच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे दोन हजार प्रवाशांची चौकशी केली आहे. प्रवाशांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे छायाचित्र काढले जात आहे.

२० फेब्रुवारी २०१९ रोजी कर्जत-आपटा ही एसटी बस आपटा स्थानकात वस्तीला आली होती. त्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याने चांगलीच खळबळ माजून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यामध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. सुरुवातीला अलिबाग-कर्जत यादरम्यान सदरची बस धावली होती. त्यानंतर तिचे वेळापत्रक बदलले आणि तीच बस कर्जतहून आपटा येथे गेली होती.

आपटा येथे एसटी बस २० फेब्रुवारी रोजी रात्री वस्तीसाठी थांबल्यानंतर वाहकाने केलेल्या तपासणीदरम्यान त्यात पांढऱ्या रंगाची पिशवी आढळली. पिशवीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने त्यांनी त्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. रसायनी पोलिसांनी तपासणी करून अलिबागमधून बॉम्बनाशक पथकाला पाचारण केले होते.

रायगडमध्ये पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाने सार्वजनिक वाहने, खासगी वाहने तसेच गर्दीच्या ठिकाणी कसून तपासणी सुरू केली. बसने जास्त पल्ल्याचा प्रवास केला होता, त्यामुळे बस ज्या- ज्या परिसरातून गेली तेथील तब्बल दोन हजार प्रवाशांना पोलीस चौकशीला बोलवत होते. प्रवाशांना प्रवासादरम्यान काही संशयित आढळले का याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीचे छायाचित्र काढण्यात येत आहे.

कर्जत आपटा भागात पोलिसांचा तपास सुरूच
बॉम्ब आढळल्याच्या घटनेला आता सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. या घटनेत बसमध्ये बॉम्ब आला कुठून याचा कसून तपास रायगड पोलीस करीत आहेत, तसेच संशयित आढळणाºया सर्वांची खोलवर चौकशी करण्यात येत आहे. तर त्या वेळेस घटनास्थळाच्या परिसरातून प्रवास करणाºया तसेच त्या दिवशी घटना परिसरात फोन केलेल्या नागरिकांचा जबाब घेऊन या घटनेसंदर्भात काही माहिती मिळतेय का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

Web Title: Two thousand people inquired about the bomb in the bus case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.