जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या दाखल;  जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 01:57 PM2022-07-06T13:57:21+5:302022-07-06T13:58:07+5:30

एनडीआरएफच्या या दोन तुकडीत प्रत्येकी 25 असे मिळून एकूण 50 जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील ही पथके महाड उपविभागात काम करतील. 

Two units of National Disaster Response Force reached in the district; Collector Mahendra Kalyankar interacted with the soldiers | जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या दाखल;  जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद

जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या दाखल;  जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद

Next

अलिबाग - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या तुकडीचे प्रमुख बी महेशकुमार व त्याच्या सहकारी जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी  महादेव रोडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.

एनडीआरएफच्या या दोन तुकडीत प्रत्येकी 25 असे मिळून एकूण 50 जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील ही पथके महाड उपविभागात काम करतील. 

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य उत्तम प्रकारे करतील, त्यामुळे रायगडकरांनी विशेषतः महाडकरांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, एनडीआरएफ पथकाचे निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.
 

Web Title: Two units of National Disaster Response Force reached in the district; Collector Mahendra Kalyankar interacted with the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.