रोह्यात ३४२ एकर जमीन लाटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:23 AM2019-08-24T00:23:37+5:302019-08-24T00:25:08+5:30

रोहे तालुक्यातील दिव या गावात गट नं. १३३ मधील १३७ हेक्टर २५ आर म्हणजे सुमारे ३४२ एकर सरकारी खाजण जमीन आहे. गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती व्यवसाय करीत आहेत.

 Types of plowing 342 acres in Roha | रोह्यात ३४२ एकर जमीन लाटण्याचा प्रकार

रोह्यात ३४२ एकर जमीन लाटण्याचा प्रकार

googlenewsNext

अलिबाग : रोहे तालुक्यातील तब्बल ३४२ एकर सरकारी जमीन प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दलालांनी घशात घातली होती, मात्र सर्वहारा जन आंदोलनाने वेळीच दलालांचे मनसुबे उघडकीस आणले आणि कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा बाहेर काढला आहे. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेत सदर व्यवहार रद्द केला आहे, अशी माहिती सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहे तालुक्यातील दिव या गावात गट नं. १३३ मधील १३७ हेक्टर २५ आर म्हणजे सुमारे ३४२ एकर सरकारी खाजण जमीन आहे. गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती व्यवसाय करीत आहेत. सदरच्या जमिनीवर शेतकºयांनी अतिक्र मण केल्याने त्यांना त्याबाबतचा दंड देखील आकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी दंड भरून ही जमीन शेतकºयांच्या नावावर करण्यात याव्यात. याबाबत येथील शेतकºयांनी तहसील प्रशासन रोहा यांना अर्ज केला होता.
याचा फायदा याच गावातील काही दलालांनी घेतला. त्यांनी शेतकºयांना बोलवून जागा नावावर करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करीत असल्याचे खोटेच सांगितले. त्यानुसार शेतकºयांनी आपापल्या सह्या दलालांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर केल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले.
दलालांनी त्यानंतर सरकार दरबारी दलालांनी आपले वजन वापरून तब्बल ३४२ एकर जमिनीवर ताबे कब्जा घेण्यासाठी महसूल अधिकाºयांना हाताशी धरून या सर्व जागेवर द. क. खोत यांच्या नावाची नोंद करून घेतली. हा झालेला बदल त्यांनी २६ जानेवारी २०१९ मध्ये जाहीर केला.
खोती जमीन जाहीर करण्यापूर्वी दलालांनी तब्बल १४२ कुळांची नावे या सातबारावर दाखल केली होती. प्रत्यक्षात या जमिनीमध्ये कसणाºया शेतकºयांची संख्या ६० आहे. या ६० शेतकºयांना कूळ म्हणून दाखल करून दलालांनी आपल्या ८२ नातेवाइकांची नावे कुळात घुसवली असल्याचा आरोप उल्का महाजन यांनी केला.
दलालांनी सरकारी खाजण जमिनीवर कुळांच्या नोंदी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी केल्या आहेत. कुळांची अखत्यार पत्र दुय्यम निबंधक कार्यालयात २ फेब्रुवारी २०१९ रोजी दाखल केली. आपण केलेली फसवणूक बाहेर पडू नये म्हणून स्थानिक शेतकºयांना कूळ बनवले. तलाठी कार्यालयात असणाºया सातबारावर मार्च आणि एप्रिलमध्ये १३ फेरफारच्या नोंदी केल्या आहेत. लावलेल्या शेतकरी कुळांना दुय्यम निबंधक कार्यालयात आणण्या आगोदर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. ही प्रक्रि या जमीन नावावर होणार असल्याचे खोटे सांगून करण्यात आली होती.

- गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती करीत आहेत. सदरच्या जमिनीवर शेतकºयांनी अतिक्र मण केल्याने त्यांना त्याबाबतचा दंड देखील आकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी दंड भरून ही जमीन शेतकºयांच्या नावावर करण्यात याव्यात. याबाबत येथील शेतकºयांनी तहसील प्रशासन रोहा यांना अर्ज केला होता.
व्यवहार झाल्यावर पैसे शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यातील २५ टक्के रक्कम शेतकºयांना दिली. उर्वरित रक्कम दलालांनी शेतकºयांना धमकावून आपल्या खिशात घातल्या आरोप उल्का महाजन यांनी केला.
जिल्ह्यात विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. शेतकºयांना कवडीमोल दर देऊन त्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी दलालांची धावपळ सुरू आहे. अनेक मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये फसवणूक करणाºया दलालांची आणि गुंतवणूकदारांची साखळी कार्यरत आहे, असेही महाजन यांनी सांगितले.

अतिक्रमण केलेल्या आणि दंड भरलेल्या जमिनी आमच्या नावावर करून देणार असल्याचे दलालांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही कागदपत्रांवर सह्या केल्या. त्यानंतर या दलालांनी आम्ही कसत असलेली जमीन गुंतवणूकदारांना विकली. विक्री व्यवहारानंतर आलेली रक्कमही त्यांनी हडप केली. दलाल आणि पंचांवर कारवाई करायला पाहिजे.
- रंजना पाटील,
महिला शेतकरी, रोहे

Web Title:  Types of plowing 342 acres in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड